लंडनः वर्ल्ड कप विजयानंतर इंग्लंडच्या संघानं आपला मोर्चा अॅशेस मालिकेकडे वळवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही पारंपरिक मालिका इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ऐतिहासिक मालिकेत दोन्ही संघ मोठ्या ताकदीनं मैदानात खेळ करतात आणि त्यामुळेच ही मालिका पाहणे क्रिकेटप्रेमीसांठी मोठी पर्वणीच असते. पण, यंदाच्या अॅशेस मालिकेत एक इतिहास घडणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नाही, अशा गोष्टीचा अॅशेस मालिकेतून शुभारंभ होणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच सफेद जर्सीवर खेळाडूंची नावं आणि क्रमांक पाहायला मिळणार आहे.
एक ऑगस्टपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अॅशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतून
आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलाही सुरुवात होणार आहे. इंग्लंडने त्यांच्या ट्विटर हँडलवरून याची अधिकृत घोषणाही केली. ज्यात कर्णधार जो रूटचा फोटो शेअर केला गेला आहे.
पण, ऑस्ट्रेलियाकडून असे कोणतेही ट्विट केले गेले नाही.