Join us

Fifa World Cup 2018: विराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोला म्हटले G.O.A.T

आत्मविश्वास, चिकाटी, धाडस आणि पूर्णपणे आवड. the G.O.A.T. @cristiano.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2018 09:01 IST

Open in App
ठळक मुद्देविराट कोहलीने ख्रिस्तियानो रोनाल्डोला म्हटले G.O.A.Tआत्मविश्वास, चिकाटी, धाडस आणि पूर्णपणे आवड. ख्रिस्तियानो रोनाल्डोचे फिफा विश्वचषकात चार गोल

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला प्रत्येक वेळी महान G.O.A.T. (Greatest Of All Time) असल्याचे म्हटले आहे. भारतीय क्रिकेट संघाने रविवारी आर्यलॅंडमध्ये जिम सेशन केले. भारतीय संघ 27 जूनला होणा-या दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आर्यलॅंडविरुद्ध खेळणार आहे.

जिम सेशन झाल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये फिफा विश्वचषकमध्ये पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यातील सामन्यादरम्यान पोर्तुगालचा खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो गोल करताना दिसत आहे. तसेच, या व्हिडीओसोबत विराटने लिहिले आहे की, आत्मविश्वास, चिकाटी, धाडस आणि पूर्णपणे आवड. the G.O.A.T. @cristiano.

दरम्यान, ख्रिस्तियानो रोनाल्डो याने यंदाच्या फिफा विश्वचषकात आतापर्यंत चार गोल केले आहेत. बेल्जियमचा स्टार खेळाडू रोमेलु लोकाकूने सुद्धा चार गोल केले आहेत. रविवारी झालेल्या पनामाविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडचा खेळाडू हॅरी केन याने पाच गोल केले असून यंदाच्या विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणारा तो इंग्लंडचा पहिलाच खेळाडू आहे.    

टॅग्स :फिफा विश्वचषक २०१८फुटबॉलक्रिकेटविराट कोहलीख्रिस्तियानो रोनाल्डोसोशल मीडिया