Join us
Daily Top 2Weekly Top 5

किंग कोहली ‘ब्लॅक वॉटर’ पितो; टीम इंडियाचा प्रिन्स चक्क लाखोंचा वॉटर प्युरीफायर सोबत घेऊन फिरतो!

सर्वोत्तम हॉटेल्समध्ये मुक्काम! तरीही खेळाडू घेतात विशेष खबरदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 13:54 IST

Open in App

इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा  सामना खेळवण्यात येणार आहे. रविवारी, १८ जानेवारीला रंगणाऱ्या निर्णायक सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू इंदूर शहरात पोहरचे आहेत. या सामन्याआधी टीम इंडियाचा प्रिन्स अर्थात शुभमन गिल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. देशातील सर्वात स्वच्छ सुंदर शहरात तो पाणी शुद्ध करण्याचं लाखो रुपयांचे मशिन घेऊन फिरतो आहे. किंग कोहली आरोग्याची खास काळजी घेण्यासाठी ४००० रुपये लीटर 'ब्लॅक वॉटर'ला पसंती देतो, या गोष्टीनंतर आता गिल सोबत घेऊन फिरत असलेल्या वॉटर प्युरीफायर चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

शुभमन गिल वापरत असलेल्या वॉटर प्युरिफायरची किंमत किती?

शुभमन गिल आपल्या सोबत घेऊन फिरत असलेल्या वॉटर प्युरीफायरची किंमत जवळपास ३ लाख रुपये इतकी असल्याचे समजते. यात केवळ साधं पाणीच नाही, तर आरओ आणि पॅकेज्ड पाणीही शुद्ध करण्याची क्षमता आहे. इंदूर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर मानलं जात असले, तरी अलीकडे शहरातील एका भागात पाण्याच्या दूषितपणाची (वॉटर कंटॅमिनेशन) घटना समोर आल्या होत्या. ज्यात अनेक जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच शुभमन गिल कोणतीही जोखीम न घेता चक्क पाणी शुद्ध करण्याचं लाखो रुपयांच मशीन घेऊन फिरतोय, अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

Smriti Mandhana Heartbreak! : स्वप्न साकारत असतानाच मोडला डाव; लकीमुळं स्मृती ठरली अनलकी! अन्...

सर्वोत्तम हॉटेल्समध्ये राहते टीम इंडिया, पण तरीही खेळाडू घेतात विशेष खबरदारी

टीम इंडिया आपल्या दौऱ्यात नेहमीच सर्वोत्तम हॉटेल्समध्ये मुक्काम करते. तरीही शुभमन गिल आपल्या आरोग्याबाबत कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाही, असेच या गोष्टीतून दिसून येते. कदाचित तो केवळ इंदूरमध्येच नव्हे, तर भारताच्या प्रत्येक शहरात ही मशीन सोबत घेऊन प्रवास करत असावा, असेही बोलले जात आहे.

विराट कोहलीचं ‘ब्लॅक वॉटर’

याआधी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि स्टार बॅटर पाण्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतानाची गोष्ट चर्चेत राहिली आहे. फिटनेवर विशेष भर देणारा किंग कोहली 'ब्लॅक वॉटर'ला पसंती देतो. या पाण्याची किंमत जवळपास ४ हजार रुपये प्रती लीटर इतकी आहे.  

टीम इंडियासोबत असतो शेफ 

गेल्या काही काळापासून टीम इंडियासोबत एक खास शेफ प्रवास करत आहे, जो प्रत्येक खेळाडूच्या डाइटनुसार जेवण तयार करतो. खेळाडूंना उत्तम आहार मिळावा आणि फिटनेस टिकून राहावा, यासाठी BCCI प्रत्येक मालिकेसाठी शेफची व्यवस्था करते. हे शेफ हॉटेलमध्येच राहून खेळाडूंसाठी जेवण बनवतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Kohli's Black Water, Gill's Purifier: India's Health Priorities

Web Summary : Virat Kohli prefers expensive 'black water,' while Shubman Gill carries a ₹3 lakh water purifier. Despite staying in top hotels, the Indian team prioritizes health, with a dedicated chef ensuring proper diets for players.
टॅग्स :शुभमन गिलन्यूझीलंडचा भारत दौराभारत विरुद्ध न्यूझीलंडविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय