Join us

विराटच्या सरावादरम्यान चाहत्यांचा गोंधळ, किंग कोहलीने दिला इशारा; Video व्हायरल

टीम इंडियाचा 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 16:24 IST

Open in App

ICC T20 विश्वचषक 2022साठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. 23 ऑक्टोबरला भारताचा पाकिस्तानसोबत सामना होणार आहे. यापूर्वी खेळाडू सराव करत आहेत. सध्या विराट कोहलीचा सरावाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो चाहत्यांवर भडकल्याचे दिसत आहे. 

टीम इंडियाचा 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG) येथे पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना होणार आहे. सामन्यासाठी विराट कोहली नेट्सवर बॅटिंगचा सराव करत होता, त्यावेळेस नेट्सच्या पाठीमागून चाहत्यांनी गोंगाट सुरू केला. सुरुवतीला विराटने चाहत्यांना सौम्य शब्दात समजावून सांगितले. पण यानंतरही जेव्हा चाहत्यांनी गोंधळ सुरू ठेवला, तेव्हा विराट त्यांच्यावर भडकल्याचे पाहायला मिळाले. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, विराट सराव करत असताना चाहते बोलत असतात. तेव्हा विचार म्हणतो, 'यार प्रॅक्टिस सुरू आहे, बोलू नका. लक्ष विचलीत होतं.' यावर चाहते म्हणतात, ठीक आहे भाई, तू आरामत सराव कर. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

टॅग्स :विराट कोहलीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आॅस्ट्रेलियापाकिस्तानभारतीय क्रिकेट संघ
Open in App