Join us  

सोनू सूदच्या मदतीनंतर प्रशासन लागलं कामाला, भारताच्या माजी कर्णधाराला मिळाली मदत

सोनू सूदच्या मदतीनंतर प्रशासकिय यंत्रणाही जागी झाली आणि त्यांनीही माजी कर्णधाराला मदत करण्याचे आदेश दिले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 1:19 PM

Open in App

लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंडे बंद असल्यामुळे मजूरांवर मोठं संकट ओढावलं आहे. अनेक खेळाडूंनाही या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. सरकारकडून काहींना आर्थिक मदत झाली असली तरी अजून अनेक जण उपेक्षितच आहेत. यात भारताच्या माजी कर्णधाराचाही समावेश आहे. भारताचा माजी कर्णधार मनरेगात दगड फोडण्याचे काम करत आहे. त्याच्या मदतीला सरकारकडून कुणीच आले नाही, परंतु बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सोनू सूदच्या मदतीनंतर प्रशासकिय यंत्रणाही जागी झाली आणि त्यांनीही माजी कर्णधाराला मदत करण्याचे आदेश दिले. 

भारतीय संघाच्या माजी कर्णधाराचा शिपाईच्या पोस्टसाठी अर्ज!

भारताच्या व्हिलचेअर क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राजेंद्र सिंग धामी याला दगड फोडण्याचं काम करावं लागत आहे.  30 वर्षीय राजेंद्र सध्या उत्तराखंड व्हिलचेअर क्रिकेट सघाचा कर्णधार आहे. लॉकडाऊनमुळे त्याचे उप्तन्नही थांबले आणइ आता त्याला मजदूराचं काम करावं लागत आहे. 3 वर्षांचा असताना त्याला अर्धांगवायूचा झटका आला. तरीही त्यानं हिंम्मत हरली नाही आणि मैदानावर दमदार कामगिरी करत अनेक पुरस्कार जिंकले. राजेंद्रनं इतिहास विषयात मास्टर पदवी घेतली आहे आणि शिवाय त्याने बीएडही केलं आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूवर लॉकडाऊनच्या काळात उपासमारीची वेळ आली आहे. 

''लॉकडाऊनपूर्वी मी व्हिलचेअरवर असलेल्या मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होतो. आता लॉकडाऊनमुळे ते काम थांबलं आहे. त्यानंतर मी पिथौरागढ या माझ्या गावी आलो. येथे माझे आई-वडील राहतात. आई-वडील म्हातारे झाले आहेत आणि मला एक बहिण आणि लहान भाऊ आहे. भाऊ गुजरात येथे एका हॉटेलमध्ये काम करतो. पण, त्यालाही नोकरी गमवावी लागली आहे. त्यामुले मी आता मनरेगा मजदूर म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून कोणतीच मदत मिळालेली नाही,''असे राजेंद्रनं 'टाईम्स ऑफ इंडिया'ला सांगितले.

तो पुढे म्हणाला,''काही लोकांनी मला मदत केली. त्यात अभिनेता सोनू सूदचाही समावेश आहे. सोनू सूद यांनी मला 11 हजार रुपये पाठवले.'' 

बोंबला! पाकिस्तान संघाची सर्व उपकरणे जप्त होणार; परवेझ मुशर्रफ यांचा करार महागात पडणार

Big News : ट्वेंटी-20 लीगचं वेळापत्रक जाहीर; शाहरूख खानचा संघ सलामीचा सामना खेळणार 

आता उत्तराखंड जिल्हाधिकारी डॉ. विजय कुमार जोगदंडे यांनी राजेंद्रला मदत करण्याचे तातडीचे आदेश जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे राजेंद्रला मुख्यमंत्री स्वरोजगार योजना किंवा अन्य योजनेतून काही मदत मिळते का, त्यासंदर्भातही आमचा प्रयत्न सुरु असल्याचे जोगदंडे यांनी सांगितले.    

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नसते, तर आपल्याकडे 'राफेल' पण नसता; बबिता फोगाट

टॅग्स :सोनू सूदभारतीय क्रिकेट संघ