आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर; केवळ 2 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा

आशिया चषक 2022 च्या किताबाचा मानकरी श्रीलंका ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 18:51 IST2022-09-13T18:50:48+5:302022-09-13T18:51:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ESPN Cricinfo has announced the Best Playing XI of the Asia Cup and only 2 players from India have made it | आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर; केवळ 2 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा

आशिया चषकातील बेस्ट प्लेइंग XI आली समोर; केवळ 2 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा

नवी दिल्ली : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) च्या किताबाचा मानकरी श्रीलंका ठरला. आपल्या पहिल्या सामन्यात पराभूत झालेल्या श्रीलंकेच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करून आशिया चषकावर नाव कोरले. स्पर्धेचे प्रबळ दावेदार मानले जाणारे भारत, पाकिस्तान या बलाढ्य संघाना नमवून श्रीलंकेने सहाव्यांदा हा किताब पटकावला. श्रीलंकेचा त्यांच्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून दारूण पराभव झाला होता. पहिल्या पराभवानंतर लंकेचा विजयरथ सुरू झाला आणि अंतिम फेरीपर्यंत देखील ही विजयगाथा सुरूच राहिली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला 23 धावांनी पराभवाची धूळ चारून श्रीलंकेने ट्रॉफीवर कब्जा केला.

दरम्यान, ESPN क्रिकइन्फोने आशिया चषक 2022 ची सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. या विशेष संघात पाकिस्तानचे तीन, तर भारत आणि अफगाणिस्तानच्या प्रत्येकी दोन खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना या यादीतून वगळण्यात आले आहे. तर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा मोहम्मद रिझवानचाही या यादीत समावेश नाही.

ESPN क्रिकइन्फोची प्लेइंग इलेव्हन 
दासुन शनाका (कर्णधार), कुसल मेंडिस, रहमानुल्लाह गुरबाज, विराट कोहली, इब्राहिम जादरान, भानुका राजपक्षा, वानिंदु हसरंगा, मोहम्मद नवाज, भुवनेश्वर कुमार, हारिस रौफ, नसीम शाह. 

श्रीलंकेने सहाव्यांदा जिंकला आशिया कप 
अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानला 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निराशाजनक सुरूवात केली. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. 36 चेंडूंत 58 धावांची ही भागीदारी रौफने संपुष्टात आणली. हसरंगा 21 चेंडूंत 5 चौकार व 1 षटकारासह 36 धावांवर माघारी परतला. मात्र राजपक्षा शानदार फलंदाजी करत होता. राजपक्षाने सातव्या बळीसाठी चमिका करुणारत्नेसह 31 चेंडूंत 54 धावा जोडल्या व संघाला 6 बाद 170 धावांचा टप्पा गाठून दिला. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या. श्रीलंकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ 20 षटकांत केवळ 147 धावा करू शकला.

 

Web Title: ESPN Cricinfo has announced the Best Playing XI of the Asia Cup and only 2 players from India have made it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.