पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी दुसऱ्या सामन्यात दमदार सुरूवात केली आहे. बेन स्टोक्स आणि डॉम सिब्ली यांनी इंग्लंडच्या डावाला आकार दिला. 3 बाद 81 धावांवरून या दोघांनी कडवी टक्कर देताना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना दमवलं. जो रूटच्या आगमनानं स्टोक्सकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि त्याचा फायदा सामन्यात झालेला दिसला. स्टोक्सनं उल्लेखनीय कामगिरी करताना कसोटीच्या दुसऱ्या दिवशी एका विक्रमाला गवसणी घातली. (England vs West Indies 2nd Test )
वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजनं 4 विकेट्स राखून विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे इंग्लंडवर प्रचंड दडपण आहे. त्यांचे सलामीचे तीन फलंदाज 81 धावांवर माघारी पाठवून विंडीजनं सामन्यावर पकड घेतली होती, परंतु स्टोक्स अन् सिब्ली यांनी जवळपास द्विशतकी भागीदारी केली आहे. (England vs West Indies 2nd Test )
या सामन्यात स्टोक्सनं 236हून अधिक चेंडूंचा सामना करताना एक विक्रम नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये त्यानं एका सामन्यात आतापर्यंत सर्वाधिक चेंडूचा सामना करण्याचा हा विक्रम आहे. यापूर्वी त्यानं 2016मध्ये भारताविरुद्ध 235 चेंडूंचा सामना केला होता.
स्टोक्सचा विक्रम
नाबाद 96 ( 236 * चेंडू) वि. वेस्ट इंडिज, आज
128 ( 235 चेंडूं) वि. भारत, 2016
नाबाद 135 ( 219 चेंडू) वि. ऑस्ट्रेलिया, 2019
120 ( 214 चेंडू) वि. दक्षिण आफ्रिका, 2020
258 ( 198 चेंडू) वि. दक्षिण आफ्रिका 2016
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कसोटीत एकाच दिवशी पडल्या 27 विकेट्स; 132 वर्षांनंतरही वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित
Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही!
इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट!
धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ
हार्दिक पांड्यानं पोस्ट केला नताशासोबत रोमँटिक फोटो; नेटिझन्सनी पाडला कौतुकाचा पाऊस
लागली पैज; क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजाला अशा 'विचित्र' पद्धतीनं बाद झालेलं पाहिलं नसेल