Join us  

England vs Ireland 1st ODI: 382 दिवसांनी घरच्या मैदानावर उतरला इंग्लंडचा संघ; आयर्लंडची झाली दैना  

England vs Ireland 1st ODI: 139 दिवसांनंतर आज पहिला आंतरराष्ट्री वन डे सामना इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुरू झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 7:25 PM

Open in App

England vs Ireland 1st ODI: 139 दिवसांनंतर आज पहिला आंतरराष्ट्री वन डे सामना इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात सुरू झाला आहे. जुलै 2019मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच वन डे सामन्यासाठी मैदानावर उतरला. तब्बल 382 दिवसांनी घरच्या मैदानावर वन डे सामन्यात उतरलेल्या इंग्लंडनं दमदार खेळाचे प्रदर्शन घडवलं. डेव्हिड विलीनं आयर्लंडच्या आघाडीच्या फळीला धक्के दिले. त्यामुळे आयर्लंडचा निम्मा संघ अवघ्या 10 षटकांत माघारी परतला.

हार्दिक पांड्याला पुत्ररत्न; भारतीय क्रिकेटपटूनं शेअर केला फोटो

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 13 मार्चला अखेरचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला होता. त्यानंतर हा पहिलाच वन डे सामना आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी वर्ल्ड सुपर लीगची (आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग) घोषणा केली. आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका वर्ल्ड सुपर लीगचा शुभारंभ आहे.  1991मध्ये दोन वन डे सामन्यांमध्ये 143 दिवसांचा ब्रेक लागला होता.  

आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 10 वन डे सामने झाले आहेत आणि इंग्लंडनं 8मध्ये विजय मिळवला आहे. आयर्लंडनं 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करून सर्वांना धक्का दिला होता. पण, विलीनं पहिल्याच षटकात आयर्लंडचा सलामीवीर पॉल स्ट्रीलिंगला माघारी पाठवले. त्यानंतर एकामागून एक धक्के देत विलीनं आयर्लंडच्या चार फलंदाजांना बाद केलं, साकीब महमूदनं एक विकेट घेत त्याला साथ दिली. विलिनं टाकलेल्या सातव्या षटकात लागोपाठ दोन विकेट घेतल्या, परंतु त्याची हॅटट्रिक हुकली. आयर्लंडच्या 10 षटकांत 5 बाद 33 धावा झाल्या आहेत...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

याला काय अर्थ आहे राव! हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; पण मीम्स बनले विराट-अनुष्कावर 

आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत! 

139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक! 

IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?

तेव्हा 'दैव' टीम इंडियाच्या बाजूनं होतं; आफ्रिदीनं अपयशाचं खापर फोडलं नशिबावर

Bold & Beauty! भारताची पहिली महिला सर्फर इशितानं वेधलं क्रीडा विश्वाचं लक्ष

टॅग्स :इंग्लंडआयर्लंडआयसीसी