139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक!

England vs Ireland : कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला लागलेला ब्रेक आता हटणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 02:06 PM2020-07-30T14:06:03+5:302020-07-30T14:07:38+5:30

whatsapp join usJoin us
England vs Ireland : One Day Format to Return After 139 Days with England and Ireland Match   | 139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक!

139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला लागलेला ब्रेक आता हटणार आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यांचाही शुभारंभ होत आहे. 139 दिवसांनंतर आज पहिला आंतरराष्ट्री वन डे सामना इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यात होणार आहे. जुलै 2019मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंग्लंडचा संघ प्रथमच वन डे सामन्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात 13 मार्चला अखेरचा आंतरराष्ट्रीय वन डे सामना खेळवण्यात आला होता. पण, त्यापलीकडे या सामन्याचं वेगळंच महत्त्व आहे.

IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी वर्ल्ड सुपर लीगची (आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग) घोषणा केली. आयर्लंड आणि वर्ल्ड कप विजेते इंग्लंड यांच्यात ३० जुलैपासून खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट मालिकेने या लीगची सुरुवात होणार आहे. 2023च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पात्रता फेरीतील ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 1991मध्ये दोन वन डे सामन्यांमध्ये 143 दिवसांचा ब्रेक लागला होता.  

इंग्लंडचा संघ आयर्लंडविरूद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच मालिकेच्या माध्यमातून क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगचा श्रीगणेशा होईल. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ अशा आठ संघांना वर्ल्ड कप स्पर्धेत थेट स्थान मिळेल.

आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत 10 वन डे सामने झाले आहेत आणि इंग्लंडनं 8मध्ये विजय मिळवला आहे. आयर्लंडनं 2011च्या वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला पराभूत करून सर्वांना धक्का दिला होता.  

इंग्लंड-आयर्लंड वन डे मालिकेचे वेळापत्रक
30 जुलै - पहिला वन डे- साऊदॅम्प्टन
01 ऑगस्ट - दुसरा वन डे - साऊदॅम्प्टन
04 ऑगस्ट - तिसरा वन डे - साऊदॅम्प्टन

सामन्याची वेळ - सायंकाळी 6.30 वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण - सोनी सिक्स, सोनी सिक्स एचडी, सोनी LIV अॅप

संभाव्य संघ
इंग्लंड - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जेम व्हिन्स, इयॉन मॉर्गन ( कर्णधार), सॅम बिलिंग, टॉम बँटन, मोईन अली, डेव्हिड विली, टॉम कुरन, आदील रशीद, सकीब महमूद

आयर्लंड - पॉल स्टीर्लिंग, जेम्स मॅककोलम, अँण्ड्य्रू बॅल्बीर्नीए ( कर्णधार), विलियम पोटरफिल्ड, गॅरी विलसन, केव्ही ओब्रायन, अँड्य्रू मॅकब्रिन, बॅरी मॅककार्थी, जॉर्ज डॉकरेल, टीम मुर्ताघ, बॉयड रॅनकीन 
 

Web Title: England vs Ireland : One Day Format to Return After 139 Days with England and Ireland Match  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.