तेव्हा 'दैव' टीम इंडियाच्या बाजूनं होतं; आफ्रिदीनं अपयशाचं खापर फोडलं नशिबावर

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं बुधवारी चाहत्यांशी ट्विटरवरून संवाद साधला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 05:28 PM2020-07-30T17:28:14+5:302020-07-30T17:28:34+5:30

whatsapp join usJoin us
'Indian team was lucky' - Shahid Afridi on his failures against India in World Cups | तेव्हा 'दैव' टीम इंडियाच्या बाजूनं होतं; आफ्रिदीनं अपयशाचं खापर फोडलं नशिबावर

तेव्हा 'दैव' टीम इंडियाच्या बाजूनं होतं; आफ्रिदीनं अपयशाचं खापर फोडलं नशिबावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीनं बुधवारी चाहत्यांशी ट्विटरवरून संवाद साधला. यावेळी पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं अनेक प्रश्नांनवर मोकळेपणानं उत्तरं दिली. त्यानं रिकी पाँटिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यातील सर्वोत्तम कर्णधार कोण, या प्रश्नाचं उत्तर देताना कॅप्टन कूल धोनीची निवड केली. पण, एका प्रश्नावर त्यानं टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न केला. 

हार्दिक पांड्याला पुत्ररत्न; भारतीय क्रिकेटपटूनं शेअर केला फोटो

वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताविरुद्धच्या कामगिरीबाबतचा तो प्रश्न होता. पाकिस्तानी खेळीडूनं चार वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध केवळ 55 धावा आणि 1 विकेट घेतली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देताना आफ्रिदीनं पळवाट शोधली आणि मी धावा केल्या नाहीत, हे भारताचं नशीब समजा असं उत्तर दिलं.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचा पाकिस्तानविरुद्धचा जय-पराजयाचा रिकॉर्ड 7-0 असा आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्येही भारतच वरचढ आहे.  पाहा नेटिझन्सनं काय प्रश्न विचारला अन् आफ्रिदीनं काय उत्तर दिलं.


1999मध्ये आफ्रिदीनं पहिला वर्ल्ड कप खेळला. सलामीला आलेल्या आफ्रिदीला केवळ पाच धावा करता आल्या. त्या सामन्यात त्यानं गोलंदाजी केली नाही. 2003मध्ये त्यानं नऊ धावा आणि 1 विकेट घेतली. भारतानं 274 धावांचं लक्ष्य 3.2 षटकं शिल्लक ठेऊन पार केले. 2011 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्ताननं उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. पण, भारतानं 29 धावांनी त्यांना पराभूत करून विजय मिळवला. त्या सामन्यात आफ्रिदीनं 10 षटकांत एकही विकेट घेतली नाही, तर केवळ 19 धावा केल्या. चार वर्षांनंतरच्या वर्ल्ड कपमध्ये त्यानं 22 धावा केल्या. 
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

याला काय अर्थ आहे राव! हार्दिक-नताशा झाले आई-बाबा; पण मीम्स बनले विराट-अनुष्कावर 

आसाम, बिहार पूरग्रस्तांच्या मदतीला धावले विराट-अनुष्का; तीन NGOना केली आर्थिक मदत! 

139 दिवसानंतर आज होणार आंतरराष्ट्रीय वन डे सामना; 29 वर्षांनंतरचा हा सर्वात मोठा ब्रेक! 

IPL 2020च्या फायनलची तारीख बदलणार, 8 नोव्हेंबर ऐवजी 'या' तारखेला होणार; पण का?

 

Web Title: 'Indian team was lucky' - Shahid Afridi on his failures against India in World Cups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.