Join us

इंग्लंड दौरा; भारताचे दोन्ही संघ विलगीकरणात, मुंबईत आठ दिवस खेळाडू राहणार एकांतात

India's England Tour: भारतीय पुरुष संघ १८ जूनपासून साऊदम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 08:42 IST

Open in App

मुंबई : भारताचे पुरुष व महिला क्रिकेट संघ आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी सज्ज झाले असून हे दोन्ही संघ सध्या मुंबईमध्ये आले आहेत. कोरोनाचा होणारा प्रादुर्भाव लक्षात घेऊन दोन्ही संघांना मुंबईमध्ये कठोर जैव सुरक्षित वातावरणात (बायोबबल) राहावे लागणार आहे. सर्व खेळाडू पुढील आठ दिवस विलगीकरणात राहतील. सर्व खेळाडू आणि सहयोगी स्टाफचे आरटीपीसीआर चाचणीचे तीन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर दोन्ही संघ इंग्लंडला रवाना होण्याची  शक्यता आहे.भारतीय पुरुष संघ १८ जूनपासून साऊदम्पटन येथे न्यूझीलंडविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळेल. यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. त्याचवेळी, भारताचा महिला संघ इंग्लंडविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका, तीन टी-२० सामन्यांची मालिका आणि एक कसोटी सामना खेळणार आहे. महिला संघाच्या मोहिमेला १६ जूनपासून सुरुवात होईल. 

खेळाडूंच्या कुटुंबाला अद्याप परवानगी नाहीमिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयकडून खेळाडूंना इंग्लंड दौऱ्यावर आपल्या परिवारासह जाण्याची परवानगी मिळालेली नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘आम्ही खेळाडूंना तीन महिन्यांपर्यंत आपल्या परिवारासह दूर ठेवू शकत नाही. मानसिक आरोग्यासाठी हे ठीकही ठरणार नाही.’ 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंडभारत विरुद्ध इंग्लंड