World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव

वनडेच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2025 13:47 IST2025-09-08T13:27:20+5:302025-09-08T13:47:12+5:30

whatsapp join usJoin us
England Cricket Team Creates History Breaks ODI Rohit Sharma's Lead Team India World Record Biggest Victory Margins In ODI Cricket By Runs Top 5 Biggest Wins In ODI Cricket | World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव

World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Biggest Victory Margins In ODI Cricket By Runs Top 5 Biggest Wins : दक्षिण आफ्रिकेतील साउथहॅम्प्टन येथील रोझ बाउल स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ३४२ धावांनी पराभूत केले. या मोठ्या विजयासह इंग्लंडच्या संघाने टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला आहे. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडच्या संघाने दमदार कामगिरीचा नजाराणा पेश केला. जेकब बेथेल (११०) आणि जो रूट  (१००) या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने निर्धारित ५० षटकांत ५ बाद ४१४ धावांचा डोंगर उभारला होता. धावांचा पाठलाग करताना जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कोलमडली अन् इंग्लंडच्या संघाने मोठ्या विजयासह वनडेत नवा विश्व विक्रम प्रस्थापित केला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

...अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला

इंग्लंडच्या संघाने दिलेल्या ४१५ धावांचे टार्गेट पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघ शंभरीचा आकडाही गाठू शकला नाही. २१ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या ७२ धावांवर ऑलआउट झाला. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याच्यासह आदिल राशीदनं ३ तर ब्रायडन कार्सनं २ विकेट्स घेत संघाच्या विक्रमी विजयात मोलाचा वाटा उचलला. याआधी वनडे सर्वाधिक धावांच्या फरकासह विजय नोंदवण्याचा विश्व विक्रम हा भारतीय संघाच्या नावे होता. २०२३ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला ३१७ धावांनी पराभूत केले होते.  इंग्लंडने हा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. ५ जानेवारी १९७१ मध्ये पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदाच एखाद्या संघाने ३४० पेक्षा अधिक धावांनी एकदिवसीय सामना जिंकला आहे.

Asia Cup साठी टीम इंडियात मिळाले नाही स्थान; नाराजीतही श्रेयस अय्यरनं दाखवला मनाचा मोठेपणा

वनडेत मोठ्या धावसंख्येच्या फरकाने विजय नोंदवणारे आघाडीचे १० संघ
 

संघप्रतिस्पर्धीफरक (धावा)वर्ष
इंग्लंडदक्षिण आफ्रिका३४२ धावा२०२५
भारतश्रीलंका३१७२०२३
ऑस्ट्रेलियानेदरलँड्स३०९२०२३
झिम्बाब्वेअमेरिका (USA)३०४२०२३
भारतश्रीलंका३०२२०२३
न्यूझीलंडआयर्लंड२९०२००८
ऑस्ट्रेलियादक्षिण आफ्रिका२७६२०२५
ऑस्ट्रेलियाअफगाणिस्तान२७५२०१५
दक्षिण आफ्रिकाझिम्बाब्वे२७२२०१०
दक्षिण आफ्रिकाश्रीलंका२५८२०१२

Web Title: England Cricket Team Creates History Breaks ODI Rohit Sharma's Lead Team India World Record Biggest Victory Margins In ODI Cricket By Runs Top 5 Biggest Wins In ODI Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.