Join us

टीम इंडियाविरुद्ध इंग्लंडची नवी चाल! ४ वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या जोफ्रा आर्चरवर लावला डाव

Jofra Archer Return in England Test Squad: जोफ्रा आर्चरचा घरच्या मैदानातील रेकॉर्ड जबरदस्त आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 17:55 IST

Open in App

IND vs ENG, 2nd Test: टीम इंडियाविरुद्धच्या बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टनच्या मैदानात रंगणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी यजमान इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जोफ्रा आर्चरला कमबॅकची संधी दिलीये. जलदगती गोलंदाज जवळपास चार वर्षांनी कसोटी संघात परतलाय. याआधी २०२१ मध्ये त्याने अहमदाबादच्या मैदानात टीम इंडियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

टीम इंडियासाठी ठरू शकतो डोकेदुखी

जोफ्रा आर्चरचा घरच्या मैदानातील रेकॉर्ड जबरदस्त आहे.  इथं आतापर्यंत त्याने ८ कसोटी सामने खेळले असून यात त्याच्या खात्यात ३० विकेट्सची नोंद आहे. दोन वेळा त्याने ५ विकेट्स घेण्याचा डावही साधघला आहे. भारतीय संघाविरुद्ध तो २ कसोटी सामने खेळला असून यात त्याच्या खात्यात ४ विकेट्स जमा आहेत. पहिल्या कसोटी सामन्यात ५ विकेट्सनं पराभवाचा सामना करावा लागलेल्या टीम इंडियासाठी जोफ्रा आर्चर डोकेदुखी ठरू शकतो. 

बुमराह संदर्भातील ती गोष्ट लपवायला हवी होती! माजी क्रिकेटरला सत्य पचनी पडेना; कारण...

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ: 

बेन स्टोक्स (कर्णधार), जोफ्रा आर्चर, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन, सॅम कुक, झॅक क्रॉली, बेन डकेट, जेमी ओव्हरटन,ओली पोप), जो रूट, जेमी स्मिथ, जोश टंग, क्रिस वोक्स. 

टॅग्स :भारताचा इंग्लंड दौरा २०२५भारत विरुद्ध इंग्लंडजोफ्रा आर्चरभारतीय क्रिकेट संघजसप्रित बुमराहशुभमन गिल