ENG W vs IND W Head To Head 1st T20I Record : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिजच्या मैदानातील टी-२० सामन्यासह इंग्लंड दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला सुरुवात करणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेतील तिरंगी मालिकेतील दिमाखदार कामगिरीनंतर मैदानात उतरतोय. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत शह दिला होता. इथं जाणून घेऊयात दोन्ही संघातील आतापर्यंतचा रेकॉर्ड अन् भारत-इंग्लंड द्विपक्षीय मालिकेत खास छाप सोडणाऱ्या खेळाडूंसदर्भातील खास गोष्टी
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंड महिला संघ विरुद्ध भारतीय महिला संघ हेड टू हेड रेकॉर्ड
इंग्लंड आणि भारत महिला क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत ३० सामने खेळवण्यात आले आहेत. यात इंग्लंडच्या संघाने २२ विजयासह आपला दबदबा दाखवून दिलाय. दुसरीकडे भारतीय संघाने फक्त ८ सामनेच जिंकले आहेत. यात इंग्लंडच्या मैदानातील १४ सामन्यात भारतीय महिला संघाने ४ सामन्यात विजय मिळला आहे. ही आकडेवारी सुधारत इंग्लंडच्या मैदानात खास छाप सोडण्यासाठी हरमनप्रीत ब्रिगेड प्रयत्नशील असेल.
या पठ्ठ्यानं शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना मारला षटकार! MI साठी पोलार्ड ठरला 'खलनायक'
भारत-इंग्लंड यांच्यातील टी-२० सामन्यात सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कुणाच्या नावे?
महिला टी-२० क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यातील सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या आघाडीच्या तीन बॅटर्समध्ये दोन भारतीय खेळाडूंचा नंबर लागतो. भारताची उप-कर्णधार आणि सलामीची बॅटर स्मृती मानधना इंग्लंड विरुद्ध २१ डावात ७२४ धावांसह टॉपला आहे. ७९ ही तिची इंग्लंड विरुद्धची सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडची डॅनी वायट-हॉज ही २२ डावातील ६१८ धावांसह दुसऱ्या तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर २६ डावात ४७२ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे दिसून येते.
गोलंदाजीत टॉप ३ मध्ये दोघी इंग्लंडच्या
भारत-इंग्लंड यांच्यातील सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत इंग्लंडच्या दोघी आघाडीवर असल्याचे दिसते. कॅथरीन सायव्हर-ब्रंट हिने भारतीय संघाविरुद्ध खेळताना १९ डावात २३ विकेट्स घेतल्याच्या रेकॉर्ड आहे. तिच्यापाठोपाठ या यादीत सोफी एक्लेस्टोनचा नंबर लागतो. तिने १५ डावात २० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मानं १९ डावात १६ विकेट्स घेतल्या आहेत.
Web Title: ENG W vs IND W Head To Head 1st T20I England vs India Women Overall Stats Mandhana Harmanpreet Kaur In Top Scorers List Highest Wicket Takers Deepti Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.