Team India Tour Of England 2025 आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या नव्या पर्वात बीसीसीआय नव्या गड्यांवर अधिक भरवसा दाखवणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. इंग्लंड दौऱ्याआधी रोहित शर्मानं कसोटीतून घेतलेली निवृत्ती, विराट कोहलीसंदर्भातील संभ्रम या गोष्टी चर्चेत असताना आता मोहम्मद शमीचा पत्ता कट होणार असल्याचा दावा करण्यात येतोय.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंड दौऱ्यावर शमीला संधी मिळणं मुश्किल
इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड २३-२४ मे रोजी केली जाऊ शकते. यावेळी भारतीय कसोटी संघाच्या नव्या कर्णधारासह अन्य काही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान मिळणे कठीण आहे, असे समोर येत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयनं शमीच्या फिटनेस आणि फॉर्म संदर्भात चिंता व्यक्त केलीये. मोहम्मद शमीनं महिन्याभरापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक केले आहे. पण तो लयीत दिसत नाही. त्यामुळे त्याचा टीम इंडियाच्या संघातून पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
गौतम गंभीरलाही वाटते की..., विराटच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चेत आणखी एका गोष्टीची भर
शमीनं कमबॅक केलं पण त्याच्या गोलंदाजीत पूर्वीसारखी धार दिसत नाही
वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेच्या फायनलपासून मोहम्मद शमी संघाबाहेर होता. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून त्याने कमबॅक केले. या स्पर्धेत त्याने पाच विकेट्सही घेतल्या. पण त्याच्या गोलंदाजीत पहिल्यासारखी धार दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जागी अन्य गोलंदाजाचा पर्याय निवडला जाऊ शकतो. आयपीएल २०२५ च्या हंगामातही त्याला प्रभावी गोलंदाजी करता आलेली नाही. काही सामन्यात तो बाकावरही बसल्याचे पाहायला मिळाले आहे.
भारत इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका
पहिला कसोटी सामना- २० जून ते २४ जून २०२५दुसरा कसोटी सामना- २ जुलै ते ६ जुलै २०२५तिसरा कसोटी सामना- १० जुलै ते १४ जुलै २०२५चौथा कसोटी सामना - २३ जुलै ते २७ जुलै २०२५पाचवा कसोटी सामना - ३१ जुलै ते ४ ऑगस्ट २०२५