इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात उप कर्णधार रिषभ पंतने दोन्ही डावात बॅटिंगमध्ये कमाल करुन दाखवली. आडवे तिडवे फटकेबाजी करणाऱ्या रिषभ पंत परिस्थितीनुसार, धैर्यानंही खेळताना दिसला. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात आपल्या शैलीच्या विपरित खेळताना त्याने टप्प्यात आलेला आणि चेंडूवर तुटून पडावे, असे वाटणारा चेंडूही सोडल्याचे पाहायला मिळाले. त्याचा हा अंदाज कौतुक करावे तितका थोडा होता. जी गोष्ट मनाला पटत नव्हती, ते त्याने लगेच बोलूनही दाखवली. अन् स्टंप माइकमध्ये कैद झालेली त्याची कमेंटही त्याच्या खेळीप्रमाणेच चर्चेत आलीये.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!पंतची फटकेबाजी करता-करता केएल राहुलसमोर 'बोलंदाजी'
दुसऱ्या डावात उलटे सुलटे फटके मारण्याचा प्रयत्न केल्यावर नॉन स्ट्राइक एन्डला असलेला लोकेश राहुल उप कर्णधार कॅप्टन रिषभ पंतला थोडं धीरानं खेळ असा सल्ला देताना दिसून आले. पंतनंही अनुभवी केएल राहुलचा सल्ला ऐकत संयमी पवित्रा घेतला. आपली शैली बाजूला ठेवून खेळताना सातत्याने चेंडू वाया गेल्यावर पंतनं मनातली गोष्ट नॉ़न स्ट्राइक एन्डला असलेल्या लोकेश राहुलला बोलून दाखवली. "पकी हुई वाली बॉल थी... इतना तमीज से खेलने के चक्कर में चूक रही है," (चेंडू फटका मारण्यासारखा होता पण संयमीरित्या खेळण्याच्या नादात तोही मारायला येईना) असे म्हणत पंतनं मनातली गोष्ट बोलून दाखवली. जी स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली. आता त्याची ही कमेंटही व्हायरल होताना दिसत आहे.
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
आधी कॅप्टनसोबत शेअर केलं आपलं दुखणं
फिल्डिंगवेळी विकेटमागे सतत बडबड करणारा पंत पहिल्या डावात फलंदाजी करताना कॅप्टन शुबमन गिलसोबत मनातल्या गोष्टी बोलून दाखवताना स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले होते. पहिल्या डावात इंग्लंडचा गोलंदाज जोश टंग याने एकाच टप्प्यावर चेंडू टाकत पंतच्या पॅडवर इनस्विंगचा मारा केल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी "सूजा दिया यार मार मार के...एकही जगह मार रहा है...असं म्हणत पंत कॅप्टन शुबमन गिलला आपलं दुखणं सांगताना दिसला होता. त्यानंतर आता दुसऱ्या डावात केएल राहुला तो मनातली गोष्ट बोलून दाखवताना दिसले.