England vs India, 1st Test : केएल राहुल आणि रिषभ पंत यांच्या शतकी खेळीसह जड्डूनं केलेल्या २५ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३६४ धावा केल्या आहेत. लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावातील ६ धावांच्या अल्प आघाडीसह भारतीय संघाने यजमान इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट सेट केले आहे. २ बाद ९० धावांवरून केएल राहुल आणि शुबमन गिल जोडीनं चौथ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. पहिल्या डावातील शतकवीर शुबमन गिल ८ धावांवरच तंबूत परतला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या उप कर्णधार रिषभ पंतनंलोकेश राहुलसोबत मजबूत भागीदारी रचत इंग्लंडच्या गोलंदाजांचे खांदे पाडले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंत-केएल राहुल जोडीची द्विशतकी भागीदारी हुकली, पण...
चौथ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाने ९२ धावांवर आपली तिसरी आणि महत्त्वपूर्ण विकेट गमावली. पण त्यानंतर सलामीवीर लोकेश राहुल आणि रिषभ पंत ही जोडी जमली. दोघांनी शतकी खेळी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत नेऊन पोहचवले. रिषभ पंतने १४० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ११८ धावांची खेळी केली. दुसऱ्या बाजूला लोकेश राहुलनं २४७ चेंडूत १८ चौकाराच्या मदतीने १३७ धावा केल्या.
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
अखेरच्या टप्प्यात जड्डूची उपयुक्त खेळी
रिषभ पंत आणि केएल राहुल शतकी शिवाय ८ वर्षांनी कमबॅक करणाऱ्या करून नायरनं ५४ चेंडूचा सामना करताना संघाच्या धावसंख्येत २० धावांची भर घातली. शार्दुल ठाकूर ४ धावांवर बाद झाल्यावर मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहला खातेही न उघडता माघारी फिरले. रवींद्र जडेजाने नाबाद २५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाच्या धावफलकावर ३६४ धावांपर्यंत नेले.