ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...

कोच गंभीर गंभीरनं आधीच दिले होते संंकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 20:24 IST2025-06-25T20:21:27+5:302025-06-25T20:24:05+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
ENG vs IND Harshit Rana Has Been Released From The Indian Squad For Remaining England Series Report | ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...

ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून फलंदाजांनी जोर लावला, पण फिल्डिंग वेळी मोक्याच्या क्षणी सोडलेल्या कॅचमुळे संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. लीड्स येथील हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवानंतर आता टीम इंडिया दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी बर्मिंघमला रवाना झाली आहे. पण ज्या गोलंदाजाला शेवटच्या क्षणी संघासोबत थांबण्यात आले होते तो टीम इंडियाच्या बसमध्ये दिसला नाही.  या गोलंदाजाला रिलीज करण्यात आले असून आता तो मायदेशी परतणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

कोण आहे तो गोलंदाज?  इंग्लंड दौऱ्याआधी त्याला का पाठवण्यात आलं घरी? 

तो गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे हर्षित राणा. भारतीय 'अ' संघातून तो इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. भारतीय 'अ' संघाचा दौरा आटोपल्यावर हर्षित राणाला बॅकअपच्या रुपात टीम इंडियासोबत थांबवण्यात आले होते. पहिल्या कसोटी सामन्यात तो संघासोबत होता. त्याची टीम इंडियात वर्णी लागू शकते, अशी चर्चाही रंगली. पण आता उर्वरित ४ कसोटी सामन्याआधी या युवा गोलंदाजाला रिलीज करण्यात आले आहे. संघात दुखापतीचं कोणतंही टेन्शन नसल्यामुळेच त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. 

रिषभ पंतच्या 'डबल' सेंच्युरीसंदर्भातील प्रश्न कोच गंभीरला खटकला; म्हणाला...

 बॅकअपच्या रुपात संघासोबत होता हा गोलंदाज

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी अंतर्गत सुरु असलेल्या इंग्लंड आणि भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना बर्मिंघमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे.  टीम इंडिया दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर या कसोटी मालिकेसाठी सराव सुरु करेल. इंग्लंड दौऱ्यातील उर्वरित कसोटी सामन्याआधी हर्षित राणाला टीम इंडियातून रिलीज करण्यात आले आहे. तो बॅकअपच्या रुपात संघासोबत होता.


गंभीरनं आधीच दिले होते संंकेत

भारतीय संघाचा मुख्य कोच हर्षित राणासंदर्भात म्हणाला होता की, भारतीय संघात दुखापतीसंदर्भातील काही समस्या असल्यामुळे त्याला  बॅकअपच्या रुपात संघासोबत थांबवण्यात आले होते. पण सध्या संघात सर्वकाही ठीक आहे. त्यामुळे त्याला रिलीज केले जाऊ शकते. हर्षित राणा याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कसोटी पदार्पण केले होते. २ कसोटी सामन्यात त्याच्या खात्यात ४ विकेट्स जमा आहेत. 
 

Web Title: ENG vs IND Harshit Rana Has Been Released From The Indian Squad For Remaining England Series Report