Join us

टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'

नव्या टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागेल, अशी चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले होते. पण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:54 IST

Open in App

Gautam Gambhir’s Coaching Record : इंग्लंड दौऱ्यातून भारतीय कसोटीतील नव्या पर्वाची सुरुवात समाधानकारक झाली. ही मालिका बरोबरीत सुटली असली तरी ती टीम इंडियासाठी विजयापेक्षा कमी नाही. कारण आव्हानात्मक दौऱ्याआधी माजी कर्णधार रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटीतून निवृत्ती घेतली होती. युवा क्रिकेटर शुबमन गिल टीम इंडियाचा नवा 'सेनापती' झाला अन्  मोठ्या बदलासह टीम इंडिया मैदानात उतरली होती. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

WTC फायनलची हॅटट्रिक हुकली

सलग दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल खेळणाऱ्या टीम इंडियाने गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये हॅटट्रिकची संधी गमावली होती. त्यामुळे टीम इंडियासह गौतम गंभीरसाठीही हा दौरा महत्त्वपूर्ण होता. नव्या टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागेल, अशी चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले होते. पण शेवटी ओव्हल कसोटीत भारतीय संघाने बरोबरीचा डाव साधला. परदेशी दौऱ्यात पहिल्यांदाच टीम इंडियाने अखेरचा सामना जिंकला अन् मालिका गमावण्याची मोठी नामुष्की टळली. एक नजर टाकुयात गौतम गंभीरनं प्रशिक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यावर २७ जुलै २०२४ पासून कशी राहिलीये टीम इंडियाची कामगिरी त्यासंदर्भातील रेकॉर्डवर... 

रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट

गंभीरच्या मार्गदर्शनाखाली T20I मध्ये टीम इंडियाची फर्स्ट क्लास कामगिरी

गौतम गंभीर ९ जुलै २०२४ रोजी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाला. कोचिंगच्या रुपात २०२७ च्या अखेरपर्यंत तो बीसीआयशी करारबद्ध झालाय. श्रीलंकेविरुद्धच्या दौऱ्यासह गंभीर पर्वाची  सुरुवात झाली. या दौऱ्यातील टी-२० मालिकेत टीम इंडियाने विजयी सिलसिला कायम ठेवला अन् छोट्या प्रकारात मोठा पराक्रमही केला. आतापर्यंत टीम इंडियाने टी-२० मध्ये एकही मालिका गमावलेली नाही. गंभीरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं १५ पैकी १३ टी-२० सामन्यात विजय नोंदवला असून २ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टीम इंडियाची विजयी टक्केवारी ९० अशी आहे.

पहिल्या वनडेत मालिकेत नापास, पण...

टी-२० मालिका जिंकल्यावर गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध पहिली वनडे मालिका खेळली.  दोन सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघावर २-० अशा पराभवाची नामुष्की ओढावली होती. पहिल्याच वनडे मालिकेत गंभीरवर नापासचा शिक्का पडला. पण त्यानंतर या प्रकारात टीम इंडियानं कमबॅक केले. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकत टीम इंडियाने वनडेत छाप सोडली. गंभीरनं सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत टीम इंडियाने ११ वनडे सामने खेळले असून यातील ८ विजय २ पराभव आणि एका अनिर्णित सामन्यासह भारतीय संघांची विजयी टक्केवारी ७२.७२ अशी आहे.

टेस्टमध्ये मात्र ATKT

टीम इंडियाने हेडमास्टर गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली १५ कसोटी सामन्यात फक्त ५ सामने जिंकले आहेत. यात बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मैदानातील मालिकेतील २ सामन्यांसह ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक आणि इंग्लंड दौऱ्यावरील मालिकेतील दोन सामन्यातील विजयाचा समावेश आहे. ८ सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला असून २ सामने हे अनिर्णित राहिले आहेत. घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाला ३-० अशा पराभवाची नामुष्की ओढावली होती. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाचे कसोटीतील विनिंग पर्सेंटेजचा आकडा हा ३३.३३ असा आहे.

टॅग्स :गौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघबीसीसीआय