Join us  

IPL 2020बाबत अमिराती क्रिकेट मंडळाकडून आली मोठी बातमी; आता प्रतीक्षा भारत सरकारच्या निर्णयाची

आयपीएल होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये एक उत्साह संचारला आहे. खेळाडूंसह चाहतेही सप्टेंबरची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 3:38 PM

Open in App

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13 व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याचे, आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पटेल यांनी आयपीएल यूएईत होणार असल्याची घोषणा केली, परंतु याबाबत संयुक्त अरब अमिराती क्रिकेट मंडळाला ( इसीबी) कोणतीच कल्पना दिली नसल्याचे वृत्त होते. अखेर सोमवारी बीसीसीआयनं इसीबीला पत्र पाठवून, संयुक्त अरब अमिरातीत ( यूएई) आयपीएल 2020चे आयोजन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

ICCची मोठी घोषणा; 30 जुलैपासून सुरू होणार 2023च्या वर्ल्ड कपची पात्रता स्पर्धा

इसीबीनं ट्विटकरून ही माहिती दिली. ''आम्हाला बीसीसीआयकडून अधिकृत पत्र मिळाले आहे आणि आता भारतीय सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे,''असे इसीबीचे सरचिटणीस मुबाशषीर उस्मानी यांनी सांगितले. ते म्हणाले,''आयपीएलच्या आयोजनासाठी अनेक गोष्टींवर काम होणं गरजेचं आहे. खेळाडूंच्या राहण्याची सोय करणं हे महत्त्वाचं आव्हान आहे. यासाठी  आम्ही सज्ज आहोत. अबु धाबी, दुबई आणि शाहजाह स्पोर्ट्स काऊंसिल, तेथील स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा या सर्वांशी चर्चा सुरू आहे. खेळाडूंची सुरक्षितता याला सर्वाधिक प्राधान्य आहे.''

भारताचा माजी कर्णधार करतोय दगड फोडण्याचं काम; Sonu Soodनं पुढं केला मदतीचा हात!

2014मध्ये युएईत आयपीएलचे काही सामने खेळवण्यात आले होते आणि तो अनुभव आता कामी येईल, असेही उस्मानी यांनी कबुल केले. ''या लीगसाठी नक्की कशाची आवश्यकता आहे, याची आम्हाला जाण आहे आणि त्यासाठी कोणाशी चर्चा करायचे आहे, हेही आम्हाला माहीत आहे. खेळाडूंच्या सरावासाठी आमच्याकडे सर्वोत्तम सुविधा आहेत. त्यामुळे आठ संघांना पुरेशी सुविधा आम्ही पुरवू शकतो,''असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य

सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?

बीसीसीआयनं माझ्याशी असं वागायला नको होतं; युवराज सिंगनं व्यक्त केली खंत 

ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मारिनच्या वडिलांचे निधन 

विरुष्काची जोडी ठरली लय भारी; दिग्गज फुटबॉलपटू अन् त्याच्या पत्नीवर केली मात

टॅग्स :आयपीएल 2020संयुक्त अरब अमिरातीबीसीसीआय