Join us

युवराज सिंग हाजीर हो... EDने दिले आदेश, २३ सप्टेंबरला चौकशीसाठी बोलवले, नेमके प्रकरण काय?

Yuvraj Singh ED Summoned: नेमक्या कोणत्या प्रकरणात युवराज सिंगला बोलवण्यात आले... जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:54 IST

Open in App

Yuvraj Singh ED Summoned: बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet शी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणात अनेक सेलिब्रिटींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. ईडीने माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगला २३ सप्टेंबर रोजी दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याआधी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पालाही २२ सप्टेंबरला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. या प्रकरणात क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचीही चौकशी करण्यात आली आहे.

या प्रकरणात बंगाली अभिनेता अंकुश हाजरा ईडी कार्यालयात गेला होता. एजन्सीने माजी टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती हिचीही चौकशी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्वशी रौतेला हिलादेखील समन्स बजावण्यात आले आहे. पण ती ईडी चौकशीत सामील होणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एजन्सी सध्या तिच्या उत्तराची वाट पाहत आहे.

भारतीय क्रिकेटपटूंची चौकशी

प्रकरणात ईडीने भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन, सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांची आधीच चौकशी केली आहे. आता युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांना ऑनलाइन बेटिंग 1xBet App च्या जाहिरातीशी संबंधित आरोपांवरून समन्स बजावण्यात आले आहे. 

Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!

काय प्रकरण आहे?

ही चौकशी बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग अँप्सशी संबंधित आहे . या अँपद्वारे अनेक गुंतवणूकदार आणि सामान्य लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली, तसेच मोठ्या प्रमाणात करचोरी करण्यात आली, असा आरोप आहे. दुसरीकडे, कंपनीचा दावा आहे की 1xBet हा एक जागतिक प्लॅटफॉर्म आहे, ज्याला बेटिंग उद्योगात १८ वर्षांचा अनुभव आहे. कंपनीच्या मते, त्यांच्या प्लॅटफॉर्मशी संबंधित युजर्सना हजारो क्रीडा स्पर्धांवर बेटिंग करण्याची सुविधा मिळते. तसेच, त्यांची वेबसाइट आणि मोबाइल अँप ७० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

टॅग्स :युवराज सिंगअंमलबजावणी संचालनालयक्रिकेट सट्टेबाजीऑफ द फिल्डपैसा