Join us

Duleep Trophy : २१ वर्षीय भारतीय गोलंदाजाची कमाल; एकाच पॅटर्नमध्ये ६ बॅटर्सचा 'करेक्ट कार्यक्रम'

वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी करत दिग्गजांच्या पक्तींत मिळवलं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 19:59 IST

Open in App

Duleep Trophy 2025, North Zone vs East Zone 1st Quarter Final देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप करंडक स्पर्धेतील पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर विभाग विरुद्ध पूर्व विभाग यांच्यातील सामना बंगळुरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पूर्व विभाग संघाकडून मैदानात उतरलेल्या झारखंडच्या २१ वर्षीय फिरकीपटू मनीषी याने पहिल्या डावात खास विक्रमाला गवसणी घातलीये. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मनीषी याने पहिल्या डावात २२.२ षटकांत १११ धावा खर्च करताना ६ विकेट्सचा डाव साधला. खास गोष्ट ही की,  त्याने सर्व फलंदाजांना पायचित केले. अशी कामगिरी करणारा भारताचा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर त्याची ही कामगिरी वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी साधणारी आहे.

कोण घेणार द्रविडची जागा? कोचच्या शर्यतीत असलेल्या ५ चर्चित चेहऱ्यांमध्ये २ भारतीय

हे सहा जण अडकले त्याच्या फिरकीच्या जाळ्यात

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मनीषी याने आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. उत्तर विभाग विरुद्धच्या क्वार्टर फायनल लढतीत त्याने अंकित कुमार, शुभम खजुरिया, यश धुल, आकिब नबी, हर्षित राणा आणि कन्हैया वधावन यांची विकेट घेतली. हे सर्वच्या सर्व फलंदाज LBW च्या रुपात बाद झाले.

वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

क्रिकेटच्या इतिहासात ६ विकेट्स हॉलचा डाव साधताना सर्वच्या सर्व फलंदाजांना पायचित करणारा मनीषी हा सहावा गोलंदाज ठरला आहे. याआधी इंग्लंडचा मार्क इलियट, श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज चमिंडा वास, पाकिस्तानचा ताबिश खान, इंग्लंडचा ओली रॉबिन्सन आणि क्रिस राइट यांनी अशी कामगिरी केली होती. मनीषनं एका डावातील खास कामगिरीसह वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी साधत पाच दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. 

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघझारखंड