West Zone vs Central Zone, 2nd Semi-Final : बंगळुरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या मैदानात पश्चिम विभाग विरुद्ध मध्य विभाग यांच्यातत दुलीप करंडक स्पर्धेतील दुसरा सेमी फायनल सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पश्चिम विभाग संघाचा कर्णधार शार्दुल ठाकूर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण संघाच्या सलामी जोडी सपशेल अपयशी ठरली. पहिल्याच षटकात एक चौकार मारून युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल तंबूत परतला. विकेट किपर बॅटर हार्विक देसाई यालाही दीपक चाहरनं स्वस्तात माघारी धाडले. चौथ्या षटकात पश्चिम विभाग संघाने अवघ्या १० धावांवर दोन्ही विकेट्स गमावल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वीकडून होती मोठी आस, पण त्याचा डाव ठरला अयशस्वी
यशस्वी जैस्वाल हा भारतीय कसोटी संघाचा प्रमुख सलामीवीर आहे. त्याच्याकडून पश्चिम विभाग संघाला मोठी आस होती. त्याने खणखणीत चौकार मारत खाते उघडले. पण खलिल अहमदनं डावातील पहिल्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरच मोठी विकेट आपल्या खात्यात जमा केली. यशस्वी जैस्वाल पायचित होऊन तंबूत परतला. त्याने ३ चेंडूचा सामना करताना संघाच्या खात्यात फक्त ४ धावा जोडल्या.
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
संघाबाहेर असलेल्या ऋतुराजनं सावरला डाव, संयमी फिफ्टीसह वेधलं लक्ष
ऋतुराज गायकवाड हा बऱ्याच दिवसांपासून टीम इंडिया बाहेर आहे. पण जिथं टीम इंडियातील पर्मनंट मेंबर असलेला यशस्वी अपयशी ठरला तिथं ऋतुराज गायकवाडनं आपल्या बॅटिंगमधील धमक दाखवली. चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन त्याने संघाला सावरणारी खेळी करताना अर्धशतक झळकावले. त्याच्याशिवाय आर्य देसाईनं ३९ धावांची खेळी केली. ऋतुराजनं गायकवाडनं त्याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी रचली. अर्धशतकी खेळी शतकात रुपांतरीत करुन संघाला मजबूत स्थितीत नेण्यासाठी तो प्रयत्नशील असेल. त्याच्यासह आता श्रेयस अय्यरवरही मोठी जबाबदारी असेल.