Duleep Trophy 2025 Semi Final, West Zone's vs Central Zone : देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित दुलीप करंडक २०२५ स्पर्धेतील उपांत्य फेरीत शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभाग संघ ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखालील मध्य विभाग संघासोबत भिडणार आहे. ४ सप्टेंबरपासून बंगळुरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलन्सच्या मैदानात हा सामना रंगणार आहे. या सामन्यात पश्चिम विभागाचा संघ मजबूत दिसतोय. पण या महत्त्वपूर्ण लढती आधी संघातील स्टार खेळाडू सरफराज खानच्या रुपात टीम इंडियाला धक्का बसला आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर पडला आहे. इथं एक नजर टाकुयात फायनलमध्ये एन्ट्री मारण्यासाठी कसा असेल पश्चिम विभागाचा संघ यासंदर्भातील माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
यशस्वी जैस्वालसोबत कोण करणार ओपनिंग?
उपांत्य सामन्यासाठी पश्चिम विभाग संघ संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. या सामन्यात यशश्वी जैस्वालसोबत हार्विक देसाई संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसू शकतो. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची जबाबदारी ही ऋतुराज गायकवाडर तर मध्यफळीत चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडल्याचे पाहायला मिळेल.
संघ कोणत्या गोलंदाजावर दाखवणार भरवसा?
पश्चिम विभाग संघाचा कर्णधार शार्दुल ठाकूर स्व:ता गोलंदाजीत आघाडीवर असेल. दुसऱ्या बाजूनं त्याच्या जोडीला तुषार देशपांडे गोलंदाजी करताना दिसेल. या दोघांशिवाय शम्स मुलानी आणि तनुष कोटियान हे फिरकीपटूच्या रुपात संघात दिसतील. सरफराज खानच्या जागी वडोदाच्या शिवालिक शर्माला पश्चिम विभाग संघात स्थान मिळाले असून तो मध्यफळीत फलंदाजी करताना पाहायला मिळू शकते.
Asia Cup 2025 स्पर्धेआधी टी-२० मध्ये भारतीय फलंदाजांचा दबदबा; टॉप १० मध्ये या चौघांचा समावेश
उपांत्य सामन्यासाठी कसा असेल शार्दुल ठाकूरच्या नेतृत्वाखालील पश्चिम विभाग संघ
यशस्वी जैस्वाल, हार्विक देसाई (विकेटकीपर/ बॅटर), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, शिवालिक शर्मा, जयमीत पटेल, शार्दुल ठाकूर (कर्णधार), शम्स मुलानी, तनुष कोटियान, तुषार देशपांडे, धर्मेंद्रसिंह जडेजा/अर्जन नागवासवाला.