Duleep Trophy 2025 : कॅप्टन्सीत चमकणारा 'हिरा'! RCB ला चॅम्पियन करणाऱ्या हिरोची कडक सेंच्युरी

४ धावांवर पहिली विकेट, दुसरा सलामीवीर रिटायर्ड हर्ट, मग कॅप्टन दाखवला शतकी शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:05 IST2025-08-28T15:46:04+5:302025-08-28T16:05:39+5:30

whatsapp join usJoin us
Duleep Trophy 2025 Central Zone Skipper Rajat Patidar Smashed A Brilliant Century Just 80 Deliveries Big Partnership With Danish Malewar | Duleep Trophy 2025 : कॅप्टन्सीत चमकणारा 'हिरा'! RCB ला चॅम्पियन करणाऱ्या हिरोची कडक सेंच्युरी

Duleep Trophy 2025 : कॅप्टन्सीत चमकणारा 'हिरा'! RCB ला चॅम्पियन करणाऱ्या हिरोची कडक सेंच्युरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Duleep Trophy 2025  Rajat Patidar Smashed A Brilliant Century : दुलीप करंडक ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात रजत पाटीदार याने दमदार शतकी खेळीसह लक्षवेधून घेतले आहे. त्याच्याशिवाय उत्तर विभाग संघातील दानिश मालेवार याच्या भात्यातूनही शतकी खेळी पाहायला मिळाली. उत्तर विभाग (Central Zone) विरुद्ध ईशान्य विभाग (North East Zone) यांच्यातील दुलीप करंडक स्पर्धेतील दुसऱ्या उपांत्य पूर्व फेरीतील दुसरी लढत खेळवण्यात येत आहे. बंगळुरुस्थित बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस बी  मैदानात ईशान्य विभाग संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  पहिली विकेटही लवकर मिळाली. पण त्यानंतर  रजत पाटीदारच्या संघानं दमदार कमबॅक करत ईशान्य विभाग संघाच्या गोलंदाजांचे खांदे पाडले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

४ धावांवर पहिली विकेट, दुसरा सलामीवीर रिटायर्ड हर्ट

आयुष पांडे अन् आर्यन जुयाल या जोडीनं उत्तर विभाग संघाची सुरुवात केली. संघाच्या धावफलकावर अवघ्या ४  धावा असताना आकाश चौधरीनं आयुष पांडेला तंबूचा रस्ता दाकवला. त्याने ३ धावा केल्या. आयन जुयाल १०० चेंडूत ६० धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर रजत पाटीदार आणि दानिश मालेवार जोडी जमली. 

Rinku Singh Fifty : आशिया कप आधी रिंकूचा पुन्हा धमाका; गोलंदाजांची २०० प्लस स्ट्राइक रेटसह धुलाई

रजत पाटीदारचा तुफानी शतक

उत्तर विभाग संघाचा कर्णधार रजत पाटीदार याने ८० चेंड़ूत शतक साजरे करत प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांचे खांदे पाडले. त्याने ९६ चेडूत  २१ चौकार अन् ३ षटकारांच्या मदतीने १३०.२१ च्या सरासरीसह १२५ धावांची खेळी केली. जोटिन फिरोजाम याने त्याच्या दमदार खेळीला ब्रेक लावला. रजत पाटीदार याने IPL मध्ये कॅप्टन्सी मिळताच RCB च्या संघाचा १७ वर्षांचा दुष्काळ संपवत संघाला चॅम्पियन केलं होते. आता उत्तर विभाग संघाची कॅप्टन्सी करताना त्याने आपल्या फलंदाजीतील धमक दाखवून दिली आहे. त्याच्याशिवाय दानिश मालेवार याने १८६ चेंडूचा सामना करताना १५२ धावा करत संघाच्या धावफलकावर ६६ षटकात ३५३ धावा लावल्या होत्या.

Web Title: Duleep Trophy 2025 Central Zone Skipper Rajat Patidar Smashed A Brilliant Century Just 80 Deliveries Big Partnership With Danish Malewar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.