Join us

Duleep Trophy 2024 : रिंकूची एन्ट्री; टीम इंडियात निवड होऊनही सर्फराज जिथं होता तिथंच!

रिंकू सिंह याच्यासह श्रेयस अय्यर, सर्फराज खान, ऋतुराज गायकवाड  छाप सोडण्यात यशस्वी ठरतील का? यावर  सर्वांच्या नजरा असतील. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 16:07 IST

Open in App

Duleep Trophy 2024: दुलिप करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील लढती १२ सप्टेंबरपासून सुरु होत आहेत. पहिल्या टप्प्यात भारत 'ब' आणि 'क' संघांनी सर्वोत्तम खेळ दाखवत विजयाची नोंद केली होती. आता दुसऱ्या टप्प्यात कोण बाजी मारणार? याशिवाय रिंकू सिंह याच्यासह श्रेयस अय्यर, सर्फराज खान, ऋतुराज गायकवाड  छाप सोडण्यात यशस्वी ठरतील का? यावर  सर्वांच्या नजरा असतील. 

या खेळाडूंना करण्यात आलं रिलीज

पहिल्या टप्प्यात देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात दिसलेला शुबमन गिल, केएल राहुल, ध्रुव जुरेल, कुलदीप यादव आणि आकाश दीप ही मंडळी दुसऱ्या टप्प्यात दिसणार नाही. कारण या खेळाडूंची निवड ही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी झाली आहे. या खेळाडूंना दुलिप करंडक २०२४-२५ च्या दुसऱ्या टप्प्यातून रिलीज करण्यात आले आहे. 

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी संघात निवड होऊन सर्फराज देशांतर्गत स्पर्धेतच खेळणार!

भारत 'ब'च्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या सर्फराज खान याचीही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात वर्णी लागली आहे. पण त्याला मात्र रिलीज करण्यात आलेले नाही. त्यामुळे तो दुसऱ्या टप्प्यातही ब संघाकडून खेळताना दिसेल. शुबमन गिलच्या जागी मयंक अग्रावल भारत 'अ' संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. गिलच्या बदली खेळाडूच्या रुपात प्रथम सिंह, केएल राहुलच्या जागी अक्षय वाडकर आणि  ध्रुव जुरेलऐवजी एसके रशीद. कुलदीपच्या जागी शम्स मुल्लानी आणि आकाश दीपच्या जागेवर आकिब खान यांचा दुलिप करंडक स्पर्धेतील संघात समावेश करण्यात आला आहे.

Duleep Trophy स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात कोणत्या संघाकडून कोण खेळणार? 

  • भारत 'अ': मयंक अग्रवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुश कोटियन, प्रसिद्ध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्र, शास्वत रावत, प्रथम सिंह, अक्षय वाडकर, एस के रशीद, शम्स मुल्लानी, आकिब खान.

 

  • भारत 'ब': अभिमन्यु ईश्वरन (कर्णधार), सर्फराज खान, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चाहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन, सुयश प्रभुदेसाई, रिंकू सिंह, हिमांशु मंत्री.

 

  • भारत 'क': ऋतुराज गायकवाड (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), बी इंद्रजीत, ह्रतिक शौकीन, मानव सुतार, गौरव यादव, विश्याक विजयकुमार, अंशुल कंबोज, हिमांशु चौहान, मयंक मारकंड्ये, आर्यन जुयाल , संदीप वारियर.

 

  • भारत 'ड': श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सारांश जैन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, तुषार देशपांडे, आकाश सेनगुप्ता, केएस भरत, सौरभ कुमार, संजू सॅमसन, निशांत सिंधू, विद्वत कावेरप्पा. 
टॅग्स :रिंकू सिंगभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ