DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा

प्रियांशनं ५२ चेंडूत ठोकली सेंच्युरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 18:13 IST2025-08-08T18:03:56+5:302025-08-08T18:13:31+5:30

whatsapp join usJoin us
DPL 2025 Priyansh Arya 111 Runs In Just 56 Balls Hit 9 Sixes 7 Fours vs East Delhi Riders For Outer Delhi Warriors Delhi Premier League 2025 | DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा

DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

DPL 2025: दिल्ली प्रीमियर लीग २०२५ च्या हंगामातील १२ व्या सामना ईस्ट दिल्ली रायडर्स आणि आउटर दिल्ली वॉरियर्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात प्रियांश आर्या नावाचं वादळ घोंगावल्याचं पाहायला मिळालं. आउटर दिल्ली वॉरियर्सकडून डावाची सुरुवात करणाऱ्या प्रितीच्या मोहऱ्यानं तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत हवा केली. शतकी खेळीसह त्याने पुन्हा एकदा मैफिल लुटली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

१२० चेंडूत २३१ धावा

ईस्ट दिल्ली रायडर्स संघाचा कर्णधार अनुज रावत याने नाणेफेक जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला.  आउटर दिल्ली वॉरियर्सच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात २३१ धावा केल्या. यात प्रियांश आर्यनं धमाकेदार शतक साजरे केले.

IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!

प्रियांशनं ५२ चेंडूत ठोकली सेंच्युरी
 
IPL स्पर्धेत प्रिती झिंटाच्या सह मालकिच्या पंजांब किंग्सकडून खेळताना दिसलेल्या २३ वर्षीय प्रियांश आर्य याने अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात धमाका केला. अवघ्या ५२ चेंडूत त्याने शतक साजरे केले. या सामन्यात त्याने ५६ चेंडूत ९ षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने  १९८.८१ च्या स्ट्राइक रेटनं १११ धावा कुटल्या.  दिल्ली प्रीमियर लीगमधील लक्षवेधी कामगिरीच्या जोरावरच IPL मधील पंजाब किंग्जच्या संघानं त्याच्यावर मोठी बोली लावली होती. आता पुन्हा तो नव्या हंगामात इथं आपला हिट शो दाखवताना दिसतोय. 

प्रियांश आर्यला करण गर्गनं दिली उत्तम साथ

आउटर दिल्ली संघाच्या डावाची सुरुवात खराब झाली होती. पहिल्यांदा प्रियांश याचा सलामीचा जोडीदार सनत सांगवान ५ चेंडूत १० धावा करून तंबूत परतला. त्यानंतर प्रियांश आर्य याने  करण गर्ग याच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी रचली. करण याने २४ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. 

Web Title: DPL 2025 Priyansh Arya 111 Runs In Just 56 Balls Hit 9 Sixes 7 Fours vs East Delhi Riders For Outer Delhi Warriors Delhi Premier League 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.