DPL 2025 Harshit Rana Fined For Aggressive Send Off : IPL च्या मैदानातील लक्षवेधी कामगिरीसह टीम इंडियात एन्ट्री मारणारा अन् गौतम गंभीरच्या मर्जीतील खेळाडू म्हणून ओळखला जाणारा हर्षित राणा सध्या दिल्ली प्रिमियर लीग २०२५ स्पर्धेत खेळताना दिसतोय. IPL असो वा DPL हा चेहरा प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांसमोर आक्रमक अंदाजात सेलिब्रेशनमुळेही अनेकदा चर्चेत राहिलाय. आता पुन्हा एकदा त्याला याची किंमत मोजावी लागलीये. नेमकं त्यानं काय केलं? त्याच्यावर कोणती कारवाई झाली जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय घडलं? इथं पाहा व्हिडिओ
शाहरुखच्या KKR सह टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केलेला हर्षित राणा दिल्ली प्रिमियर लीग स्पर्धेत नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स संघाकडून मैदानात उतरला आहे. सोमवारी वेस्ट दिल्ली विरुद्धच्या सामन्यात राणानं विकेटचा आनंद व्यक्त करताना प्रतिस्पर्धी फलंदाजासमोर आक्रमक अंदाजात आनंद व्यक्त केला. युश दोसेजा याचा त्रिफळा उडवल्यावर हर्षित राणानं हातवारे करत "चल नीघ..." असा इशारा करत तंबूचा रस्ता दाखवला. याप्रकरणी हर्षित राणाला कलम २.५ नुसार, दोषी ठरवण्यात आले असून सामन्याच्या मानधनातील १० टक्के रक्कम कपात करण्याची शिक्षाही ठोठावण्यात आलीये.