Rohit Pawar Slams Shama Mohamed :काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) बाबत केलेल्या वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. शमा मोहम्मद यांनी आपल्या एक्स पोस्टद्वारे रोहितला लठ्ठ म्हटले आणि त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केला. याशिवाय, त्यांनी रोहितला भारतीय इतिहासातील सर्वात अप्रभावी कर्णधार म्हटले. यावरुन वादंग उठले असून, राष्ट्रवादी काँग्रेस(शप)चे आमदार रोहित पवारांनी शमा मोहम्मद यांना फटकारले आहे.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी सुरू आहे. सलग तीन सामन्यांमध्ये विजय मिळवून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मजल मारली आहे. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल, असा विश्वासही चाहत्यांना आहे. मात्र शमा मोहम्मद यांच्या पोस्टने नवा वाद निर्माण केला आहे. यावरुन रोहितचे चाहते नाराज झालेच आहेत, शिवाय अनेक राजकीय नेत्यांनीही शमा यांच्यावर टीका केली आहे.
त्यांना क्रिकेट तरी कळतो का..?
शमा मोहम्मद यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार म्हणतात, 'क्रिकेट काय आहे, कसे खेळायचे, हे माहितेय का? सर्व खेळाडू आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात, ते सर्व लिजेंड्स आहेत. छातीवर भारताचा लोगो मिळवणे सोपे नाही. एकवेळ राजकारणी होणे सोपे आहे, पण खेळाडून होणे, देशाचे प्रतिनिधित्व करणे सोपे नाही. त्यामुळे राजकारण्यांनी फक्त राजकारण करावे, खेळाबद्दल बोलू नये. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. मी रोहित शर्मा आणि देशासाठी खेळणाऱ्या प्रत्येकाचा चाहता आहे. अशाप्रकारची वक्तव्ये टाळावे आणि त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी', अशी टीका रोहित पवारांनी दिली.
शमा मोहम्मद यांना काँग्रेसने फटकारले
काँग्रेसने शमा मोहम्मद यांच्या विधानापासून फटकारले आहे. काँग्रेसचे मीडिया प्रभारी आणि प्रवक्ते पवन खेरा म्हणाले की, पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एका दिग्गज क्रिकेटपटूबद्दल काही विधाने केली आहेत जी पक्षाच्या भूमिकेशी जुळत नाहीत. त्यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ते ट्विट डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे आणि भविष्यात सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
काय म्हणाल्या शमा मोहम्मद?
![]()
रोहितच्या चाहत्यांनी घेतला समाचार...
शमा मोहम्मद यांनी एक्स अकाउंटवरील एका पोस्टच्या माध्यमातून रोहित जाडा आणि अनफिट खेळाडू आहे, अशी कमेंट केली. भारतीय कॅप्टनवरील त्यांची ही कमेंट बॉडी शेमिंगची आहे, अशा प्रतिक्रिया उमटल्या. सोशल मीडियावर हिटमॅनच्या फॅट अन् फिटनेसवरील कमेंटमुळे काँग्रेस महिला प्रवक्त्या असलेल्या शमा मोहम्दम यांना रोहितच्या चाहत्यांनी ट्रोलिंग करण्यासही सुरुवात केली आहे.
Web Title: 'Do you even know what cricket is, how to play it?' Rohit Pawar's blunt criticism of Shama Mohammed
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.