6,6,6,6,6,6! दिपेंद्रने युवी, पोलार्ड यांच्या विक्रमाशी बरोबरी; शिवाय T20I त मोठी मजल मारली 

युवीने केलेली ती आतषबाजी आजही लोकांच्या नजरेसमोर आहे. तशी फटकेबाजी पाहण्यासाठी २०२१ साल उजाडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 06:41 PM2024-04-13T18:41:20+5:302024-04-13T18:43:16+5:30

whatsapp join usJoin us
DIPENDRA SINGH AIREE, FROM NEPAL HIT 6 SIXES IN AN OVER in T20I, He becomes the third player after Yuvraj & Pollard to achieve the milestone in shorter format. | 6,6,6,6,6,6! दिपेंद्रने युवी, पोलार्ड यांच्या विक्रमाशी बरोबरी; शिवाय T20I त मोठी मजल मारली 

6,6,6,6,6,6! दिपेंद्रने युवी, पोलार्ड यांच्या विक्रमाशी बरोबरी; शिवाय T20I त मोठी मजल मारली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Nepal vs Qatar T20I - २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अँड्य्रू फ्लिंटॉफने भारताच्या युवराज सिंगला डिवचले नसते तर स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सहा षटकार पाहायला मिळाले नसते. युवीने केलेली ती आतषबाजी आजही लोकांच्या नजरेसमोर आहे. तशी फटकेबाजी पाहण्यासाठी २०२१ साल उजाडला. किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त श्रीलंकेविरुद्ध असाच पराक्रम केला होता आणि २०२४ मध्ये या लिस्टमध्ये नेपाळच्या दिपेंद्र सिंग ऐरी  ( DIPENDRA SINGH AIREE) याचे नाव समाविष्ठ झाले आहे. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त एका षटकात सगल ६ सिक्स मारणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.

ACC Men's Premier Cup स्पर्धेतील सातवा सामना नेपाळ विरुद्ध कतार यांच्यात सुरू आहे. नेपाळने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला. नेपाळचा सलामीवीर कुशल भुर्तेल ( १२) व कर्णधार रोहित पौडेल ( १८) हे माघारी परतले. पण, आसीफ शेखने ४१ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ५२ धावा चोपल्या. कुशल मल्लाने १८ चेंडूंत २ चौकार व ३ षटकारांसह ३५ धावांची फटकेबाजी केली. पण, त्यानंतर नेपाळचा डाव गडगडला. दिपेंद्र एका बाजुने लढत होता आणि त्याने २०व्या षटकात सलग ६ षटकार खेचून संघाला २१० पर्यंत पोहोचवले.


दिपेंद्रने २१ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह नाबाद ६४ धावा चोपल्या. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त दोन अर्धशतकं ३०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला.  त्याने २०२३ मध्ये मंगोलियाविरुद्ध १० चेंडूंत नाबाद ५२ धावा केल्या होत्या.  



Web Title: DIPENDRA SINGH AIREE, FROM NEPAL HIT 6 SIXES IN AN OVER in T20I, He becomes the third player after Yuvraj & Pollard to achieve the milestone in shorter format.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.