Join us

दिनेश कार्तिक पुन्हा क्रिकेटच्या मैदानात दिसणार, 'या' स्पर्धेत खेळणारा ठरणार पहिला भारतीय

Dinesh Karthik comeback: यंदाच्या IPL नंतर कार्तिकने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2024 17:52 IST

Open in App

Dinesh Karthik comeback: IPL 2024मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ स्पर्धेबाहेर झाल्यानंतर क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा करणारा माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक पुन्हा एकदा क्रिकेट खेळणार आहे. पुढील वर्षी तो क्रिकेटच्या मैदानात पुनरागमन करणार आहे. २०२५ मध्ये पार्ल रॉयल्स संघाकडून तो खेळताना दिसणार आहे. दिनेश कार्तिकला मंगळवारी पार्ल रॉयल्सने SA20च्या तिसऱ्या हंगामासाठी करारबद्ध केले. ९ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील T20 क्रिकेटमध्ये खेळणारा दिनेश कार्तिक पहिला भारतीय क्रिकेटपटू असणार आहे.

IPLमध्ये दीर्घकाळ खेळणाऱ्या ३९ वर्षीय कार्तिकने या वर्षी जूनमध्ये क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला मेंटॉर कम बॅटिंग कोच म्हणून नियुक्त केले आहे. भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये १८० सामने खेळलेल्या कार्तिकने कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात मॅच फिनिशर म्हणून दमदार कामगिरी केली. आपल्या नव्या इनिंगबद्दल तो म्हणाला, "माझ्याकडे दक्षिण आफ्रिकेत खेळण्याच्या खूप अनुभव आहे. जेव्हा ही संधी मिळाली तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही. कारण परत क्रिकेट खेळायला मिळणं ही भावनाच खूप छान होती. स्पर्धात्मक क्रिकेट आणि रॉयल्ससह ही अविश्वसनीय स्पर्धा जिंकणे हाच माझा हेतू असेल."

कार्तिकने IPL 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून शेवटचा टी20 लीग सामना खेळला. २०२४ च्या मोसमात त्याने १४ सामन्यात १८७ च्या स्ट्राइक रेटने ३२६ धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा शेवटचा सामना बांगलादेश विरुद्ध २०२२ मध्ये खेळला. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान हा सामना खेळला गेला होता.

टॅग्स :दिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटद. आफ्रिका