"तो एक महान क्रिकेटर असून भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे", कार्तिकची अश्विनसाठी बॅटिंग

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनला वगळल्याने भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 16:02 IST2023-07-01T16:02:18+5:302023-07-01T16:02:40+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Dinesh Karthik has said that R Ashwin is deserve to captain the Indian cricket team  | "तो एक महान क्रिकेटर असून भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे", कार्तिकची अश्विनसाठी बॅटिंग

"तो एक महान क्रिकेटर असून भारताचा कर्णधार होण्यास पात्र आहे", कार्तिकची अश्विनसाठी बॅटिंग

नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनला वगळल्याने भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित झाले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अश्विनला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या अंतिम सामन्यात संधी मिळाली नव्हती. कर्णधार रोहितने फिरकीपटू म्हणून रवींद्र जडेजा हा एकच पर्याय आजमावला. पण या मोठ्या व्यासपीठावर भारताल मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर अश्विनचा दाखला देत अनेकांनी टीम इंडियावर टीकास्त्र सोडले. अशातच भारतीय खेळाडू दिनेश कार्तिकने अश्विनसाठी बॅटिंग करताना तो भारताच्या कर्णधारपदासाठी पात्र असल्याचे म्हटले आहे. 

भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून १२ जुलैपासून कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. आगामी कसोटी मालिकेसाठी अश्विनला संघात स्थान मिळाले आहे पण प्लेइंग इलेव्हनमध्ये तो दिसणार का हे पाहण्याजोगे असेल. अश्विनचे कौतुक करताना कार्तिकने म्हटले, "अश्विन हा आजवर खेळलेल्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. मला वाटते की तो एकदा भारताचे कर्णधार होण्यास पात्र आहे, मला विश्वास आहे की त्याने टीम इंडियाचा कर्णधार होण्याचा अधिकार मिळवला आहे."

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा वन डे संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उम्रान मलिक, मुकेश कुमार.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक 

  1. पहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 
  2. दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून) 

 
वन डे मालिकेचे वेळापत्रक 

  1. पहिली वन डे - २७ जुलै, बार्बाडोस (वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  2. दुसरी वन डे - २९ जुलै, बार्बाडोस (वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 
  3. तिसरी वन डे - १ ऑगस्ट, त्रिनिदाद (वेळ सायंकाळी ७ वाजल्यापासून) 

Web Title: Dinesh Karthik has said that R Ashwin is deserve to captain the Indian cricket team 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.