SA vs CAN, T20 World Cup 2026 Dilon Heylige Stunning Catch Video : टी-२० वर्ल्ड कप २०२६च्या हंगामात स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच सहभागी छोट्या देशांतील संघ आपली धमक दाखवून देताना दिसत आहेत. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही हे संघ सर्वोच्च दर्जाची कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मैदानातील अप्रतिम क्षेत्ररक्षकांच्या यादीत आता कॅनडाचा वेगवान गोलंदाज डिलन हेयलिगर याचाही समावेश झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कॅनडाच्या जलदगती गोलंदाजाने पेश केला क्षेत्ररक्षणाचा सर्वोच्च नजराणा
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात मार्करमच्या वादळी खेळीला लगाम घालताना हेयलिगरने टिपलेला कमालीचा झेल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कॅनडाच्या ३६ वर्षीय खेळाडूने सीमारेषेवर हवेत झेपावत कमालीच्या संतुलनासह पकडलेला हा झेल सर्वांनाच थक्क करणारा ठरला. कॅनडाविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम कमालीच्या फॉर्ममध्ये दिसत होता. अर्धशतक झळकावल्यानंतर तो कॅनडासाठी अधिक धोकादायक ठरेल, असे वाटत होते. मात्र सीमारेषेबाहेर जाणाराच वाटणारा त्याचा उत्तुंग फटका हेयलिगरने अप्रतिम झेलमध्ये परिवर्तित करत आपली छाप पाडली.
मार्करमचा खेळ खल्लास! सीमारेषवर टिपलेला झेल होता एकदम झक्कास
दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १२व्या षटकात मार्करम आक्रमक मोडमध्ये होता. अंश पटेलने टाकलेल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने खणखणीत चौकार मारून आपले इरादे स्पष्ट केले. मात्र लगेचच पुढच्या चेंडूवर लाँग ऑनच्या दिशेने खेळलेला त्याचा फटका हेयलिगरने उडी मारत, लवचिकता आणि संतुलनाचा सुरेख मिलाफ दाखवत झेलला. हा झेल पाहून मार्करमसह स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकही थक्क होऊन पाहत राहिले.
मार्करमचं अर्धशतकानंतर स्टब्ससह मिलरची किलर खेळी, दक्षिण आफ्रिकेची द्विशतकाला गवसणी
मार्करमने कॅनडाविरुद्धच्या सामन्यात ३२ चेंडूत १० चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १८४.३८ च्या स्ट्राईक रेटसह ५९ धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय अखेरच्या षटकांत रायन रिकल्टन ३३ (२१), डेविड मिलर ३९ (२३)* आणि ट्रिस्टन स्टब्स ३४ (१९)* यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकांत ४ बाद २१३ धावा करत कॅनडासमोर डोंगराएवढ्या धावसंख्येचं आव्हान उभं केलं.
Web Summary : In the T20 World Cup 2026, Canada's Dilon Heyliger took a spectacular catch at the boundary to dismiss a well-set Aiden Markram. Markram scored 59. South Africa scored 213/4, thanks to killer innings from Miller and Stubbs.
Web Summary : टी20 विश्व कप 2026 में, कनाडा के डिलन हेयलिगर ने बाउंड्री पर शानदार कैच लेकर शानदार फॉर्म में चल रहे एडेन मार्करम को आउट किया। मार्करम ने 59 रन बनाए। मिलर और स्टब्स की शानदार पारियों की बदौलत दक्षिण अफ्रीका ने 213/4 रन बनाए।