Team India Sponsor Deal History : ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५ मंजूर होताच ड्रीम इलेव्हनचा खेळ खल्लास झालाय. हे बिल आलं अन्आ शिया कप स्पर्धेआधी ड्रीम इलेव्हन (Dream 11 ) चा टीम इंडियासोबत असणारी स्पॉन्सरशिप डील संपली. आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? जुन्या स्पॉन्सरपैकी एखादी कंपनी पुढे येणार की, नवा स्पॉन्सर भेटणार हे पाहण्याजोगे असेल. पण त्याआधी एक नजर टाकुयात टीम इंडियानं जर्सी स्पॉन्सरच्या रुपात क आतापर्यंत इथं जाणून घेऊयात आतापर्यंत भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर कोणतं कोणतं नाव दिसलंय अर्थात टीम इंडियाच्या स्पॉन्सरचा खास इतिहास
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् टीम इंडियाचे 'अच्छे दिन' येण्यास सुरुवात झाली
Team India PC-MI FB
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९८३ मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. या विश्व विक्रमी कामगिरीनंतर भारतीय क्रिकेटचा जगात गाजावाजा झाला. इंग्लंडमध्ये इतिहास रचला अन् टीम इंडियाचे अच्छे दिन हळूहळू सुरु झाले. याआधी भारतीय संघाचे सामने राष्ट्रीय चॅनेल असलेल्या दूरर्दशनवर प्रसारित व्हायचे. कधी कधी बीसीसीआयलाच सामने दाखवण्यासाठी पैसे द्यावे लागायचे. पण १९८४ पासून अल्प रक्कम का असेना ती टीम इंडियाला मिळायला लागली. नव्वदीच्या दशकात स्टार आणि ESPN सारखे स्पोर्ट्स चॅनेलची एन्ट्री झाली अन् BCCI चा कमाईचा आकडा उंचावण्यास सुरुवात झाली. त्यातीलच एक भाग म्हणजे जर्सी स्पॉन्सरच्या माध्यमातून मिळणारा पैसा.
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी अन् कुणाच्या रुपात मिळाला?
Team India ICC
१९९२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ रंगीत जर्सीत खेळला. पण त्यावेळी टीम इंडियाकडे कोणताही जर्सी स्पॉन्सर नव्हता. १९९३ मध्ये टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर मिळाला. ITC लिमिटेडसोबत BCCI दिर्घकालीन करार झाला. १९९३ ते २००१ या ९ वर्षांच्या कालावधीत आयटीसी लिमिटेड (विल्स आणि आयटीसी हॉटेल्स) टीम इंडियाची अधिकृत स्पॉन्सर कंपनी होती. यावेळी टीम इंडियाला प्रत्येक कसोटी सामन्यासाठी ३५ लाख तर वनडेसाठी ३२ लाख एवढी रक्कम मिळायची.
मग टीम इंडियाला मिळाला सहाराचा सारा
Team India ICC
भारतीय क्रिकेट संघाच्या स्पॉन्सर डीलमधील सहारा कंपनीसोबतची डील ही देखील यशस्वी राहिली. २००१ ते २०१३ या मोठ्या कालावधीसाठी भारतीय संघाच्या जर्सीवर 'सहारा इंडिया' हे नाव पाहायलाम मिळाले. या कंपनीसोबतच्या करारातून BCCI ला प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ३ कोटी ३४ लाख एवढी रक्कम मिळत होती.
मग झाली स्टार इंडियाची एन्ट्री
२०१४ ते २०१७ या कालावधीत BCCI च्या स्पॉन्सरच्या रुपात स्टार इंडियाची एन्ट्री झाली. या डीलमध्ये द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक सामन्यासाठी BCCI ला १ कोटी ९२ लाख रुपये मिळत होते. आयसीसीच्या एका सामन्यामागे BCCI ला या करारात ६१ लाख रुपये इतकी रक्कम मिळायची.
चीनच्या कंपनीनं मोजली होती मोठी किंमत
चीन मोबाईल कंपनी ओपो कंपनी ही देखील भारतीय क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरच्या यादीत आहे. २०१७ ते २०१९ या कालावधीत ओपो कंपनीने BCCI सोबत १०७९ कोटींचा करार केला होता. भारत-चीन यांच्यातील राजकीय संबंध तणावपूर्ण झाल्यावर चीनच्या अनेक गोष्टींवर बहिष्कार टाकण्यात आला. याचा परिणाम या डीलवर झाला अन्ओ पोसोबतचा मोठा करार संपुष्टात आला.
टीम इंडियाच्या जर्सीवर झळकलंय बायजूचंही नाव
चीनच्या कंपनीचे शटर बंद झाल्यावर BCCI नं बायजूसोबत करार केला. तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीनं २०१९-२०२३ या कालावधीतील करारासाठी जवळपास १०७९ कोटी रुपये मोजले होते. आर्थिक अडचणीत सापडल्यावर कंपनीचा करार संपुष्टात आला. याशिवाय MPL Sports नं अचानक करार मोडल्यावर Killer जीन्स (Kewal Kiran Clothing Ltd.) हे नाव स्पॉन्सरच्या रुपात टीम इंडियाशी जोडलं गेले होते. त्यानंतर २०२३ ते २०२६ पर्यंत ड्रीम इलेव्हन कंपनीने बीसीसीआयसोबत ३५८ कोटींचा करार केला. हा करार अर्ध्यावरच मोडला आहे.
Web Title: Did You Know Who Is First Sponsor Deal With Team India See Full List List of Sponsors Of Indian Cricket Team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.