IND vs PAK मॅच अन् Boycott चा ट्रेंड; भारताने कधी घेतलेला Asia Cup या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय?

इथं जाणून घेऊयात भारत-पाक संघांनी कधी अन् कोणत्या कारणास्तव आशिया कप स्पर्धेतून घेतली होती माघार  त्यासंदर्भातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 20:34 IST2025-09-14T19:27:29+5:302025-09-14T20:34:08+5:30

whatsapp join usJoin us
Did You Know Indian Cricket Team Boycott Asia Cup In 1986 Due To Civil War In Sri Lanka Pakistan Two Time Do This Act | IND vs PAK मॅच अन् Boycott चा ट्रेंड; भारताने कधी घेतलेला Asia Cup या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय?

IND vs PAK मॅच अन् Boycott चा ट्रेंड; भारताने कधी घेतलेला Asia Cup या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Did You Know Indian Cricket Team Boycott Asia Cup : भारत-पाक सामना हा नेहमीच चर्चेचा आणि उत्सुकता वाढवणारा विषय ठरला आहे. पण यावेळी आशिया कप स्पर्धेतील सामन्याआधी वातावरण फिरलं आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने या स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

बीसीसीआय अधिकाऱ्यांसह टीम इंडियातील कोचिंग स्टाफनं स्पष्ट केली भूमिका

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसह टीम इंडियातील कोचिंग स्टाफमधून सरकारच्या सूचनेनुसार, आम्ही खेळत आहोत, अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. भारताचे माजी कर्णधार अन् दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी सरकारच्या निर्णयावर आपण काहीच करू शकत नाही, अशी भूमिका मांडलीये. पण तुम्हाला माहितीये का? आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने एकदा तर पाकिस्तानच्या संघाने दोन  वेळा बहिष्कार टाकला होता. इथं जाणून घेऊयात भारत-पाक संघांनी कधी अन् कोणत्या कारणास्तव आशिया कप स्पर्धेतून घेतली होती माघार  त्यासंदर्भातील माहिती

'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य

दुसऱ्या हंगात भारतीय संघाने घेतला होता न खेळण्याचा निर्णय, कारण...

१९८४ पासून आशिया कप स्पर्धा घेतली जाते. पहिल्या हंगामात भारत-पाकिस्तान यांच्यासह श्रीलंकेचा संघ या स्पर्धेत खेळताना दिसला होता. या स्पर्धेतील दुसरा हंगामम १९८६ मध्ये झाला. त्यावेळी भारतीय संघाशिवाय ही स्पर्धा झाली होती. श्रीलंकेच्या शितयुद्धाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने भारतीय संघाला श्रीलंकेत या स्पर्धेसाठी पाठवण्यास नकार दिला होता. आशियाई क्रिकेट परिषदेनं यावर तोडगा काढत भारताच्या जागी बांगलादेशच्या संघाला स्पर्धेत एन्ट्री दिली होती. 

 पाकिस्तानच्या संघाने दोन वेळा घेतलाय असा निर्णय, एकदा तर स्पर्धाच करावी लागली रद्द

भारत-पाक यांच्यातील राजकीय संबंध हे पूर्वीपासूनच तणावपूर्ण राहिले आहेत. याचा क्रिकेट संबंधावर थेट परिणाम झाल्याचेही दिसून आले आहे. भारताशिवाय पाकिस्तानच्या संघानेही एकदा नव्हे तर दोन वेळा आशिया कप स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. १९९०-९१ च्या हंगामात भारताच्या यजमानपदाखाली आशिया चषक स्पर्धा झाली होती. राजकीय तणावामुळे  पाकिस्तानच्या संघाने भारतात येण्यास नकार दिला होता. त्यावेळी ही स्पर्धा भारत, श्रीलंका आणि बांगलादेश या तीन संघात खेळवण्यात आली होती. १९९३ मध्येही पाकिस्तानने हीच भूमिका घेतल्यामुळे स्पर्धाच रद्द झाली होती.

Web Title: Did You Know Indian Cricket Team Boycott Asia Cup In 1986 Due To Civil War In Sri Lanka Pakistan Two Time Do This Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.