Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य

Ellyse Perry Proposes Babar Azam Fact Check: बाबर आझम सध्या ऑस्ट्रेलियात BBL स्पर्धा खेळतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 15:33 IST

Open in App

Ellyse Perry Proposes Babar Azam Fact Check: सोशल मीडियावर सध्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट स्टार एलिस पेरी आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम यांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एलिस पेरी भर मैदानात गुडघ्यावर बसून बाबर आझमला लग्नासाठी प्रपोज करत असल्याचा दावा केला जात आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर भरपूर कमेंट्स पाहायला मिळाल्या आहेत. पण हे खरंच घडलं का? हा फोटो खरा आहे की AIने तयार केलेला? असे सवालही इंटरनेटवर सुरु झाले. जाणून घेऊया या व्हायरल फोटोमागचे नेमके सत्य.

नेमका दावा काय आहे?

गेल्या काही दिवसांपासून बिग बॅश लीग (BBL) २०२५-२६च्या दरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये दावा केला जात आहे की, एलिस पेरीने लाईव्ह सामन्यादरम्यान बाबरला लग्नाचा प्रस्ताव दिला. भरमैदानात हा प्रकार घडला. या प्रकारानंतर चाहते प्रचंड उत्साही झाल्याचे दिसले. त्यातही आणखी महत्त्वाचे म्हणजे बाबरआझमने देखील ते प्रपोजल स्वीकारले. त्यामुळे या फोटोची क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली. पण हा फोटो खरा नसल्याचे आता समोर येत आहे.

व्हायरल फोटो खरा नाही...

या फोटोबाबत विविध टेक्निकल चाचण्या करण्यात आल्या. त्यात हा एआय जनरेटेड फोटो (AI-Generated) असल्याते स्पष्ट झाले. तपासात असे समोर आले की, व्हायरल झालेला फोटो खोटा असून तो 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. फोटोमधील लाईट इफेक्ट, खेळाडूंचे चेहरे आणि बॅकग्राउंडमधील प्रेक्षकांचे निरीक्षण केल्यास त्यात तांत्रिक त्रुटी स्पष्टपणे दिसून आल्या.

दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी होते...

ज्यावेळी ही घटना घडल्याचा दावा केला जात होता, तेव्हा एलिस पेरी ऑस्ट्रेलियात नव्हती. ती न्यूझीलंडमध्ये 'विमेन्स सुपर स्मॅश' लीग खेळण्यात व्यस्त होती. तर बाबर आझम ऑस्ट्रेलियात सिडनी सिक्सर्ससाठी बीबीएल सामने खेळत होता. त्यामुळे दोघांची भेट होणेही शक्य नव्हते. तसेच, कुठल्याही अधिकृत क्रीडा वाहिनीने किंवा दोन्ही खेळाडूंनी अशा प्रकारच्या घटनेला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे फोटो खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच, आणखी एक वेगळा फोटोही शेअर करण्यात आला आहे.

या व्हायरल फोटोमधील मुलगी कोण? तो फोटो खरा की खोटा? याबाबतही साशंकता आहे. एलिस पेरी आणि बाबर आझम यांच्या प्रपोजलच्या बातम्या केवळ 'क्लिकबेट' आणि सोशल मीडियावरील अफवा आहेत. चाहत्यांना अशा बनावट फोटोंवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले हे दावे पूर्णपणे तथ्यहीन असून केवळ एआय टूल्सच्या मदतीने बनवल्याचे निष्पन्न झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ellyse Perry proposes to Babar Azam? Viral photo fact-check.

Web Summary : Viral photos claim Ellyse Perry proposed to Babar Azam during a BBL match. The claim is false. The photo is AI-generated. Perry was in New Zealand, and Azam was in Australia. No official sources confirmed the proposal.
टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाव्हायरल फोटोज्बाबर आजम