Suryakumar Yadav Dhurandhar FA9LA Dance video: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या त्याच्या फलंदाजीसोबतच त्याच्या डान्समुळेही चर्चेत आला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई इंडियन्सच्या एका खास कार्यक्रमात सूर्यकुमारने बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय खन्ना याच्या 'धुरंधर' चित्रपटातील एका आयकॉनिक डान्स स्टेपची हुबेहूब नक्कल केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.
काय आहे हा व्हायरल डान्स?
२०२५ मधील सुपरहिट चित्रपट 'धुरंधर'मधील 'Fa9la' या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेल्या डान्स स्टेप्स सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत. या चित्रपटात अक्षय खन्नाने 'रेहमान डकैत' ही भूमिका साकारली होती. मुंबई इंडियन्सने २ एप्रिल रोजी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवरून सूर्याचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो अगदी 'धुरंधर' मोडमध्ये स्टेजवर एन्ट्री करताना दिसतो.
बॉलिवूड आणि क्रिकेटचा मेळ
या व्हिडिओला मुंबई इंडियन्सने "ये दादा का स्टाइल है, पूरा धुरंधर मोड" असे कॅप्शन दिले आहे. 'धुरंधर' चित्रपटाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर तब्बल १३०० कोटींची कमाई करून सुपरहिट ठरला होता आणि आता त्याचा सीक्वल 'धुरंधर २' देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सूर्यकुमारची ही 'फिल्मी एन्ट्री' पाहून चाहतेही थक्क झाले.
चाहत्यांच्या प्रतिक्रिया
सूर्यकुमार यादवने ज्या सफाईदारपणे अक्षय खन्नाचे मूव्ह्स कॉपी केले आहेत, त्याचे कौतुक क्रिकेट प्रेमी आणि चित्रपट प्रेमी अशा दोन्ही स्तरांतून होत आहे. "सूर्या फक्त मैदानावरच नाही तर डान्समध्येही ३६० डिग्री आहे," अशी कमेंट काहींनी केली आहे.
Web Summary : Suryakumar Yadav's recreation of Akshay Khanna's 'Dhurandhar' dance moves has gone viral. His performance at a Mumbai Indians event is being widely praised. Fans are impressed by his 360-degree talent, both on and off the cricket field, with many appreciating his accurate rendition of the iconic steps.
Web Summary : सूर्यकुमार यादव का अक्षय खन्ना के 'धुरंधर' डांस मूव्स का रीक्रिएशन वायरल हो गया है। मुंबई इंडियंस के एक कार्यक्रम में उनके प्रदर्शन की व्यापक रूप से सराहना की जा रही है। प्रशंसक क्रिकेट के मैदान पर और बाहर उनकी 360-डिग्री प्रतिभा से प्रभावित हैं।