Join us

Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स

कुलदीप यादवनं इंग्लंड दौरा बाकावर बसून काढला, दीपक चाहर तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 12:36 IST

Open in App

Duleep Trophy 2025, Kuldeep Yadav And Deepak Chahar Play Dhruv Jurel Captaincy : इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघातील खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत. अँडरसन-तेंडुलकर कसोटी मालिकेत पंतची जागा भरून काढणाऱ्या ध्रुव जुरेल याला मायदेशी परतल्यावर कॅप्टन्सीची लॉटरी लागली आहे. देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप करंडक स्पर्धेत तो कॅप्टन्सी करताना दिसणार आहे.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!रजत पाटीदारकडे उप कर्णधारपद

दुलीप करंडक ट्रॉफी स्पर्धेत रजत पाटीदार देखील मध्य विभाग संघाचा भाग असून त्याच्याकडे उप कर्णधार पद देण्यात आले आहे. या स्पर्धेत मध्य विभाग संघ आपला पहिला सामना उत्तर-पूर्व (North East) संघाविरुद्ध खेळेल. हा सामना   बंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सीलेन्सच्या मैदानात २८ ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. 

शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी

जुरेलच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनीयर्स

BCCI च्या अंतर्गत होणाऱ्या दुलीप करंडक स्पर्धेसाठी मध्य विभाग संघाची घोषणा नुकतीच करण्यात आली. या संघात भारतीय संघातील स्टार अन् वरिष्ठ खेळाडू असणाऱ्या कुलदीप यादव आणि दीपक चाहर या दोघांचाही समावेश आहे. ही जोडगोळी मध्य विभाग संघाकडून ज्युनिअर ध्रुव जुरेलच्या नेतृत्वाखाली मैदानात कर्तृत्व सिद्ध करताना दिसेल.

कुलदीप यादवनं इंग्लंड दौरा बाकावर बसून काढला, दीपक चाहर तर....

कुलदीप यादव हा इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघाचा भाग होता. पण पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत एकाही सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. संपूर्ण दौरा बाकावर बसून काढल्यावर आता तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली धमक दाखवून देताना दिसेल. दुसरीकडे दीपक चाहर हा बऱ्याच दिवसांपासून तंदुरस्तीच्या समस्येचा सामना करत आहे. दुलीप करंडक स्पर्धेतून तो दमदार कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

दुलीप करंडक स्पर्धा २०२५; असा आहे मध्य विभाग संघ

ध्रुव जुरेल (कर्णधार, यष्टीरक्षक), रजत पाटीदार (उप कर्णधार), आर्यन जुयाल, दानिश मालेवार, संचित देसाई, कुलदीप यादव, आदित्य ठाकरे, दीपक चाहर, सारांश जैन, आयुष पांडे, शुभम शर्मा, यश राठोड, हर्ष दुबे, मानव सुथार, खलील अहमद.

टॅग्स :कुलदीप यादवदीपक चहरबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ