Join us

वाढदिवस धोनीचा, पण ट्रोल झाली अनुष्का शर्मा

शनिवारी धोनीने आपल्या काही मित्रांसह वेल्सची राजधानी कार्डिफमध्ये वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये कोहली तर होताच, पण अनुष्काही तिथे उपस्थित होती. धोनीने केक कापला, तेव्हा या दोघांचे तिथे लक्ष नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 18:50 IST

Open in App
ठळक मुद्देधोनीच्या मित्राने त्याच्या चेहऱ्याला केक फासला, त्यावेळी तर अनुष्का विराटकडे रागाने बघत होती.

लंडन : भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस शनिवारी झाला. भारतीय संघाबरोबर असल्यामुळे धोनीने आपला वाढदिवस कार्डिफमध्ये साजरा केला. धोनीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरु असताना तिथे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही उपस्थित होते. पण सेलिब्रेशन सुरु असताना विराट आणि अनुष्का यांचं काही तरी वेगळंच सुरु होतं, त्यामुळेच अनुष्का सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

शनिवारी धोनीने आपल्या काही मित्रांसह वेल्सची राजधानी कार्डिफमध्ये वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये कोहली तर होताच, पण अनुष्काही तिथे उपस्थित होती. धोनीने केक कापला, तेव्हा या दोघांचे तिथे लक्ष नव्हते. धोनीच्या मित्राने त्याच्या चेहऱ्याला केक फासला, त्यावेळी तर अनुष्का विराटकडे रागाने बघत होती. अनुष्का विराटकडे रागाने का बघत होती, याचे उत्तर कुणाकडे नाही. पण ती विराटकडे अशी का बघत होती, यावर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

काही जणांनी अनुष्कालाही केक हवे असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी तर अनुष्का विराटला घरी जाण्याची तंबी देत असल्याचे म्हटले आहे. काहींनी तर आपल्या वाढदिवसाला पण विराट असाच केक फासणार का, असे अनुष्का विचार करत असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीअनुष्का शर्माविराट कोहलीइंग्लंड विरुद्ध भारतक्रिकेटविरूष्काबॉलिवूड