Join us
Daily Top 2Weekly Top 5

धोनी सोशल मीडियापासून राहतो अलिप्त, चक्क ६ महिन्यानंतर केलं ट्विट

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या, तर अनेकांनी नाराजीही व्यक्ती केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 11:37 IST

Open in App

नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक स्टार आणि सेलिब्रिटी एक्टीव्ह आहेत. कित्येक क्रिकेटर्संही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात. भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंदर सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हेही सातत्याने ट्विटरवर पाहायला मिळतात. मात्र, आपल्या शांत-संयमी स्वभावाप्रमाणे महेंद्रसिंह धोनी ट्विटरवरही शांतच दिसून येतो. धोनीने तब्बल  6 महिन्यानंतर ट्विटरवर पोस्ट केली. विशेष म्हणजे तीही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्राचे आभार मानण्यासाठीच. 

धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीनंतर जगभरातून त्याला शुभेच्छा देण्यात आल्या, तर अनेकांनी नाराजीही व्यक्ती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही धोनीला पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या असून धोनीच्या खेळीतील आठवणीही जागवल्या. क्रिकेटर, भारतीय सैन्य दलाचा अधिकारी, यासह उत्तम माणूस असल्याचं म्हणत मोदींनी धोनीचे कौतुकही केले. पंतप्रधानांच्या या पत्रानंतर धोनीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मोदींच्या पत्राबद्दल आभार मानले.   

‘धोनी तुझ्यात नव्या भारताचा आत्मा दिसतो. 'न्यू इंडिया' मध्ये युवांची नियती त्यांच्या कुटुंबीयांची ओळख दाखवत नाही तर युवा खेळाडू स्वत: आपले नाव कमावतात आणि यशाच्या शिखरावर विराजमान होतात. धोनी तू, १५ ऑगस्टला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि हा व्हिडीओ बरेच काही सांगून जातो. यामध्ये खेळाबद्दल एखाद्या व्यक्तीला किती वेड असावे, हेदेखील समजते.’ अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. धोनीनेच टिष्ट्वटरवरुन हे पत्र शेअर केले आहे.

‘कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना केवळ कौतुकाची अपेक्षा असते. त्यांनी केलेल्या कामाची आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचे सर्वांनी कौतुक करावे असे त्यांना वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद,’असे म्हणत धोनीने पंतप्रधानांनी पाठवलेले पत्राचे  ट्विटरवरुन आभारही मानले. विशेष म्हणजे धोनीने यापूर्वीचे ट्विट 14 फेब्रुवारी रोजी केले होते. कान्हा येथील व्याघ्र दर्शनाचा फोटो धोनीने ट्विट केला. त्यामध्येही आपल्या इंस्टाग्रामची लिंक पेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर, धोनीने तब्बल 6 महिने व 8 दिवसांनंतर ट्विट केलं आहे. तेही पंतप्रधानांचे आभार मानण्यासाठी. 

धोनीचे ट्विटरवर 7.9 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. तर, धोनी केवळ 34 जणांना फॉलो करतो. त्यामध्ये, सचिन तेंडुलकरसह इतर काही खेळाडू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्य दलाच्या अकाऊंलाही धोनी फॉलो करत आहे. तसेच, सलमान आणि आमीर खानलाही धोनी फॉलो करतो.  

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीट्विटरनरेंद्र मोदी