Join us

आशिया चषक स्पर्धेत दव ठरणार निर्णायक : गावसकर

गावसकर यांनी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत, शुभमन गिलच्या कामगिरीबाबत, अर्शदीपच्या कामगिरीसंबंधी आणि विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 22:00 IST

Open in App

नवी दिल्ली :  '९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये भारताच्या आयोजनात सुरू होणाऱ्या एशिया चषक स्पर्धेत दव हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरेल. कारण, सामने रात्री खेळले जाणार आहेत,' असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गावसकर यांनी या स्पर्धेचे अधिकृत प्रसारक सोनी स्पोर्ट्स नेटवर्कतर्फे मीडियासाठी आयोजित संवाद कार्यक्रमात अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यामध्ये ‘लोकमत’तर्फे स्पोर्ट्स हेड मतीन खान सहभागी झाले होते. स्पर्धेतील सर्व सामने सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपित केले जातील. गावसकर यांनी जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत, शुभमन गिलच्या कामगिरीबाबत, अर्शदीपच्या कामगिरीसंबंधी आणि विविध मुद्द्यांवर आपले मत मांडले.तंत्रज्ञानाचा वापर परिणाम कमी करेल

आशिया चषक स्पर्धेतील सामने प्रकाशझोतात भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होतील. अशा परिस्थितीत मैदानावर दवाची समस्या राहील, ज्यामुळे गोलंदाजांना अडचण येऊ शकते. याबद्दल मतीन खान यांनी विचारलेल्या प्रश्नावर गावसकर म्हणाले, 'होय, दवाचा परिणाम नक्कीच होईल, पण आजकाल तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा परिणाम कमी करता येतो.' ते पुढे म्हणाले की, 'यूएईमध्ये या काळात खेळपट्ट्या कोरड्या असतील आणि चेंडूला फिरकी मिळेल.'अर्शदीपची लय पाहावी लागेल!

डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग, जो इंग्लंड दौऱ्यावर पाचही कसोटी सामन्यांमध्ये केवळ बाकावर बसला होता, तो मानसिकदृष्ट्या थकला नसेल का? आणि तो यातून कसा सावरू शकेल, या प्रश्नावर गावसकर म्हणाले, 'अर्शदीप तरुण आहे. नेट्समध्ये त्याने हजारो चेंडू टाकले असतील, पण आशिया चषकामध्ये त्याची लय कशी राहते ते पाहावे लागेल. पांढऱ्या चेंडूच्या दोन्ही प्रकारात ‘नो-बॉल’वर फ्री-हिट मिळतो. यामुळे सामन्याची स्थिती बदलू शकते. अशा प्रसंगांना अर्शदीप कसा सामोरा जातो, हे महत्त्वाचे ठरेल.'

'गिलच्या कामगिरीवर शंका नाही'

शुभमन गिलविषयी गावसकर म्हणाले की, 'गिलने आयपीएलमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे आशिया चषकामध्ये त्याच्या कामगिरीबद्दल काहीच शंका नाही. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने ७५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, जे चांगले लक्षण आहे.' जितेश शर्मापेक्षा संजू सॅमसनला प्राधान्य देत गावसकर म्हणाले की, 'तो क्रमांक तीनवरही खेळू शकतो आणि गरज पडल्यास सहाव्या क्रमांकावर फिनिशरची भूमिकाही निभावू शकतो.' 

टॅग्स :आशिया कप २०२५सुनील गावसकरभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघ