Join us

तब्बल चारवेळा आऊट होऊनही वॉर्नरने लगावला शतकांचा चौकार; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टाकला अजब व्हिडीओ

नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने शतक झळकावले. पण शतक झळकावण्यापूर्वी तो बाद झाला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 12:56 IST

Open in App

मुंबई : एखादा खेळाडू बाद झाला तर तो शतक कसे पूर्ण करू शकतो, हा अगदी साध्या क्रिकेट चाहत्याला सहज प्रश्न पडू शकतो. पण ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने मात्र असे केले आहे. मुख्य गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळानेच असा एक अजब व्हिडीओ आपल्या फेसबूकवर पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये वॉर्नरच्या चार खेळ्या दाखवण्यात आल्या आहेत. या चारही खेळींमध्ये वॉर्नरने शतक झळकावले आहे. पण मुख्य गोष्ट म्हणजे शतक झळकावण्यापूर्वी वॉर्नर बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. पण मग बाद झाल्यावरही वॉर्नर कसा काय खेळत राहीला, हा प्रश्न तुम्हाला पडला आहे.

https://www.facebook.com/watch/?v=902779500117468

नुकत्याच झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने शतक झळकावले. पण शतक झळकावण्यापूर्वी तो बाद झाला होता. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीमने वॉर्नरला बाद केले होते. पण तो नो बॉल असल्याचे पंचांनी दाखवून दिले. त्यानंतर मात्र वॉर्नरने शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने टाकलेल्या व्हिडीओमध्ये वॉर्नर चारवेळा शतकांपूर्वीच बाद झाला होता. पण चारही वेळा नो बॉल पाहायला मिळाले आणि याचा फायदा घेत वॉर्नरने चारही वेळा शतक झळकावल्याचे पाहायला मिळाले. 

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरआॅस्ट्रेलियापाकिस्तान