आयपीएल २०२६ च्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ नव्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. पहिल्या वहिल्या IPL ट्रॉफीच्या प्रतिक्षेत असणारा संघ 'टायगर स्पिरिट'सह हंगाम गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीचे संघाची मालकी असणाऱ्या जीएमआर आणि जेएसडब्ल्यू ग्रुपने नव्या हंगामासाठी संघासाठी नवी आणि आकर्षक जर्सी लॉन्च केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!अक्षर पटेलसह जेमिमाचाही रुबाब चर्चेत
"एकही प्याला नको रे बाबा!" चहलनं दारु सोडली; एबी डिव्हिलियर्सशी गप्पा मारताना तो नेमकं काय म्हणाला?
जर्सीसंदर्भात दिल्लीकर CEO यांची खास प्रतिक्रिया
दिल्ली कॅपिटल्सचे सीईओ सुनील गुप्ता म्हणाले की, "ही जर्सी दिल्ली शहराची ओळख आणि मैदानात साहसी वृत्तीनं वावरण्याचे प्रतिक आहे. पहिल्यांदाच महिला संघाची कर्णधार जेमिमाला खास संधी मिळाली. ही गोष्ट दिल्ली कॅपिटल्सच्या दोन्ही संघात एकीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. निळ्या-लाल रंगातील टायगर डरकाळी फोडण्यासाठी तयार आहेत." अशा आशयाच्या शब्दांत दिल्ली कॅपिटल्सच्या सीईओंनी संघ दमदार कामगिरी करून दाखवेल, अशा विश्विस व्यक्त केला आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा आतापर्यंतचा प्रवास
दिल्ली कॅपिटल्सचा संघ २००८ पासून IPL स्पर्धेचा भाग आहे. याआधी हा संघ दिल्ली डेयरडेविल्स नावाने खेळत होता. २०१९ पासून हा संघ दिल्ली कॅपिटल्स नावाने मैदानात उतरतो. २०२० मध्ये या संघाने पहिल्यांदा फायनल खेळली होती. पण आतापर्यंत त्यांनी एकदाही ट्रॉफी जिंकलेली नाही. दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने WPL मध्ये आतापर्यंत झालेल्या चारही हंगामात फायनल खेळली. पण त्यांना फायनलमध्ये प्रत्येक वेळी विजयाने हुलकावणी दिली.
Web Summary : Delhi Capitals launched their new jersey for IPL 2026 with captains Akshar Patel and Jemimah Rodrigues. The franchise aims to promote equality in cricket through this initiative. CEO Sunil Gupta expressed confidence in the team's performance, highlighting the jersey's representation of Delhi's spirit.
Web Summary : दिल्ली कैपिटल्स ने आईपीएल 2026 के लिए अक्षर पटेल और जेमिमा रोड्रिग्स के साथ नई जर्सी लॉन्च की। इस पहल से क्रिकेट में समानता को बढ़ावा देना है। सीईओ सुनील गुप्ता ने टीम के प्रदर्शन पर विश्वास जताया और जर्सी को दिल्ली की भावना का प्रतीक बताया।