Join us  

DC vs KXIP Latest News : वर्ल्ड कप गाजवणाऱ्या गोलंदाजनं KXIPकडून पदार्पणात घेतली मोठी विकेट, Video

DC vs KXIP Latest News : मोहम्मद शमीनं दिलेल्या सुरुवातीच्या धक्क्यानंतर श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी डाव सावरला

By स्वदेश घाणेकर | Published: September 20, 2020 8:36 PM

Open in App

IPL 2020 DC vs KXIP Latest News : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) 13व्या पर्वातील दुसरा सामना आज दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर ( Dubai International Cricket Stadium ) सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) यांच्यात सुरू झाला आहे. KXIPने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या DCला दुसऱ्याच षटकात झटका बसला. DCचा सलामीवीर शिखर धवन ( Shikhar Dhawan) याचा मोहम्मद शमीच्या ( Shami) गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर पहिल्या पाच षटकांत दिल्लीचे 3 फलंदाज माघारी परतले होते. शमीनं दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात 20 वर्षीय रवी बिश्नोईनं ( Ravi Bishnoi )  IPLमध्ये KXIPकडून पदार्पणं केलं. 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या या खेळाडूवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. ( IPL 2020 Live Updates, Click here)

लोकेश राहुलची आजच्या सामन्यात अ‍ॅडम गिलख्रिस्टच्या 'Unique' विक्रमाशी बरोबरी 

KL Rahulनं झेल सोडला? पण, शिखर धवनचा 'पोपट' झाला, भोपळ्यावर माघारी परतला

आजचा सामना हा किंग्ज ईलेव्हनचा कर्णधार के.एल.राहुल याचा कर्णधार म्हणून पहिला सामना आहे. आयपीएल एकदाही न जिंकलेल्या दोन संघांची ही लढत आहे. दोन्ही संघाचे कर्णधार , के.एल.राहुल (वय 28) व श्रेयस अय्यर (वय 25) हे यंदाच्या आयपीएलमधील तुलनेने सर्वात तरुण कर्णधार आहेत. त्यामुळे या दोन्ही युवा कर्णधारांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा आहे. उभय संघ 24वेळा समोरासमोर आले आणि त्यात सर्वाधिक 14वेळा पंजाबनं ( KXIP) बाजी मारली आहे. DCला 10 सामने जिंकता आले. या दोन संघातील गेल्या पाच पैकी चार लढती पंजाबने जिंकल्या आहेत. शेवटची लढत मात्र दिल्लीने जिंकली होती. ( IPL 2020 Live Updates, Click here)

शमीनं ( Shami) टाकलेल्या दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर धवनचा झेल लोकेश राहुलनं सोडला. तो झेल होता की नाही हा चर्चेचा विषय आहे. पण, त्यानंतर धवन एक धाव घेण्यासाठी पुढे धावला. पृथ्वी शॉने त्याला माघारी जा असे सांगण्यापूर्वी राहुलनं ( KL) चेंडू पुन्हा हातात घेतला अन् के गौवथमकडे टाकला. त्यानं लगेच धवनला धावबाद केले. धवनला भोपळाही न फोडता माघारी जावं लागलं. त्यानंतर शमीनं चौथ्या षटकात DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि शिमरोन हेटमायर यांना माघारी पाठवले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये दिल्लीच्या 3 बाद 23 धावा होत्या. ( IPL 2020 Live Updates, Click here)

कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांनी दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी DCची विकेट्सची पडझड थांबवली. दोघांनी संयमी खेळ करताना दहा षटकांत 3 बाद 49 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) ने चौथ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी करून DCचा डाव सावरला. पण, युवा वर्ल्ड कप गाजवणाऱ्या रवी बिश्नोईनं ही सेट जोडी तोडली. त्यानं पंतला त्रिफळाचीत केले. पदार्पणवीर रवी बिश्नोईनंही 4 षटकांत 21 धावा देत 1 विकेट घेतली. 

पाहा व्हिडीओ

IPL 2020 MI vs CSK : महेंद्रसिंग धोनीनं IPLमधून माघार घेणाऱ्या सुरेश रैनाचे कान टोचले? म्हणाला...

कोण आहे रवी बिश्नोई ( Who is Ravi Ravi Bishnoi ) 

  • राजस्थानच्या या फिरकीपटूनं युवा वर्ल्ड कप गाजवला. किंग्स इलेव्हन पंजाबनं त्याच्यासाठी 2 कोटी रुपये मोजले आहेत. पंजाबचे मुख्य प्रशिक्षक अनील कुंबळे त्याला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी दिली.
  • 5 सप्टेंबर 2000 मध्ये राजस्थानच्या जोधपूर येथे रवी बिश्नोईचा जन्म झाला.
  • 2018-19मध्ये त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत राजस्थान संघाकडून पदार्पण केले.
  • 2019-20मध्ये त्यानं राजस्थानकडून विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण केले
  • ऑक्टोबर 2019मध्ये त्याची भारत अ संघात देवधर ट्रॉफीसाठी निवड झाली
  • 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत त्यानं सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या होत्या, 

अन्य महत्त्वाच्या बातम्या 

संजय मांजरेकरने ओढावला नवा वाद; अंबाती रायुडू, पीयूष चावला यांना म्हणाला 'Low Profile' क्रिकेटपटू

MI vs CSK Latest News : कोण हरलं, कोण जिंकलं? हे विसरा; खेळाडूंच्या वाढलेल्या 'पोटा'वरून रंगलीय चर्चा 

ख्रिस गेलची विश्वविक्रमाडे वाटचाल; दिल्लीसमोर त्याला रोखण्याचे आव्हान

दिल्ली-पंजाब सामन्यात तीन मोठे विक्रम मोडणार; सुरेश रैनाला धक्का बसणार

IPL 2020 CSK : चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो दुसऱ्या सामन्यालाही मुकणार 

टॅग्स :IPL 2020किंग्स इलेव्हन पंजाबदिल्ली कॅपिटल्स