Join us

On This Day: १५ धावांत संपूर्ण संघ परतला माघारी, ४५ मिनिटांत खेळ संपला; क्रिकेटच्या मैदानावरील धक्कादायक सामना

क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवसात एक वेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. ११७ वर्षांपूर्वी बरोबर ९ फेब्रुवारीला क्रिकेटच्या मैदानावर सर्वांना आश्चर्यचकित ...

By स्वदेश घाणेकर | Updated: February 9, 2021 11:38 IST

Open in App

क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवसात एक वेगळा विक्रम नोंदवला गेला आहे. ११७ वर्षांपूर्वी बरोबर ९ फेब्रुवारीला क्रिकेटच्या मैदानावर सर्वांना आश्चर्यचकित करणारी घटना घडली होती. ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी सामन्यात व्हिक्टोरिया ( Victoria) आणि एमसीसी ( MCC) यांच्यातल्या सामन्यातील हा विक्रम आहे. यात व्हिक्टोरिया संघाचा डाव अवघ्या १५ धावांत गुंडाळला गेला होता. १९०४ साली झालेला हा सामना आजही क्रिकेटप्रेमींच्या चर्चेचा विषय ठरतो.  ३८ वर्षीय जेम्स अँडरसनचा भारी पराक्रम, टीम इंडियाला ढकललं पराभवाच्या छायेत

या सामन्या व्हिक्टोरिया संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती आणि त्यांनी पहिल्या डावात २९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात एमसीसीचा संघ २४८ धावा करू शकला आणि व्हिक्टोरियानं पहिल्या डावात ५१ धावांची आघाडी घेतली. या सामन्यात एमसीसीच्या कमबॅकची शक्यता फार कमीच होती, परंतु चमत्कार झाला. एमसीसीचे गोलंदाज रोड्स आणि आर्नोल्ड यांनी व्हिक्टोरियाचा दुसरा डाव १५ धावांवर गुंडाळला. व्हिक्टोरियाच्या हॅरी ट्रॉटनं दुसऱ्या डावात सर्वाधिक ९ धावा केल्या. रोड्सनं ६ धावांत ७ आणि आर्नोल्डनं ८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. What a Ball!; जेम्स अँडरसनचे चार चेंडू अन् टीम इंडियाला दोन जबरदस्त धक्के, Video 

एमसीसीनं ६७ धावांचे लक्ष्य ८ विकेट्स राखून सहज पार केले. ४५ मिनिटांत सामन्याचा निकाल लागला.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९५५मध्ये न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध २६ धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर २००४मध्ये श्रीलंकेनं झिम्बाब्वेचा डाव ३५ धावांत गुंडाळला होता. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियाचा दुसरा डाव ३६ धावांवर गुंडाळला. टीम इंडियाचा ११वा फलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाला. थर्ड अम्पायरची बारीक नजर अन् टीम इंडियाच्या नावे नकोसा विक्रम!

टॅग्स :आयसीसीआॅस्ट्रेलिया