India vs England, 1st Test : ३८ वर्षीय जेम्स अँडरसनचा भारी पराक्रम, टीम इंडियाला ढकललं पराभवाच्या छायेत

India vs England, 1st Test Day 5 : अनुभव कसा कामी येतो, याची प्रचिती जेम्स अँडरसननं ( James Anderson) करून दिली. जेम्स अँडरसननं भारताविरुद्ध कसोटीत घेतल्या ११४ विकेट्स, भारताविरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

By स्वदेश घाणेकर | Published: February 9, 2021 11:19 AM2021-02-09T11:19:49+5:302021-02-09T11:20:07+5:30

whatsapp join usJoin us
James Anderson surpasses Courtney Walsh by taking most number of wickets as a pacer since the age of 30 | India vs England, 1st Test : ३८ वर्षीय जेम्स अँडरसनचा भारी पराक्रम, टीम इंडियाला ढकललं पराभवाच्या छायेत

India vs England, 1st Test : ३८ वर्षीय जेम्स अँडरसनचा भारी पराक्रम, टीम इंडियाला ढकललं पराभवाच्या छायेत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England, 1st Test Day 5 : अनुभव कसा कामी येतो, याची प्रचिती जेम्स अँडरसननं ( James Anderson) करून दिली. टीम इंडियाचा हुकमी एक्का कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) यानं ३८ वर्षीय जिमीला पाचारण केलं. त्यानं पहिल्याच षटकात शुबमन गिल ( Shubman Gill) आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांचा त्रिफळा उडवला. त्यानंतर रिषभ पंत ( Rishabh Pant) यालाही माघारी पाठवून टीम इंडियाची अवस्था ५ बाद ११० केली. यात भर म्हणून डॉम बेसनं वॉशिंग्टन सुंदरलाही माघारी पाठवले आणि आता इंग्लंड विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. विराटला तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन सामना वाचवण्यासाठी ६७ षटकं खेळावी लागतील.  What a Ball!; जेम्स अँडरसनचे चार चेंडू अन् टीम इंडियाला दोन जबरदस्त धक्के, Video 

१ बाद ३९ धावसंख्येवरून पाचव्या दिवशी पराभव टाळण्याच्या इराद्यानं मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाची हालत खराब झाली आहे. रोहित शर्माचा त्रिफळा उडवणाऱ्या जॅक लीचनं सकाळच्या सत्रात चेतेश्वर पुजाराला माघारी पाठवून टीम इंडियाला धक्का दिलाच होता. पाहुण्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्याच कसोटीत टीम इंडियाची घरच्या मैदानावर अशी अवस्था होईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती. भारताला पराभव टाळण्यासाठी आता पाचव्या दिवशी संघर्ष करावा लागत आहे. २४१ धावांची आघाडी घेऊन इंग्लंडचा संघ पुन्हा मैदानावर उतरला. पण, यावेळी आर अश्विननं ६ विकेट्स घेत त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.   थर्ड अम्पायरची बारीक नजर अन् टीम इंडियाच्या नावे नकोसा विक्रम!


पहिल्या डावातील द्विशतकवीर कर्णधार जो रूटनं सर्वाधिक ४० धावा केल्या. इंग्लंडचा डाव १७८ धावांवर गडगडला. पण, तरीही भारतासमोर ४२० धावांचं तगडं आव्हान उभं राहिलं. रोहित शर्मा व शुबमन गिल ही जोडी चांगली फटकेबाजी करताना दिसली. परंतु जॅक लीचनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला. रोहित १५ धावांवर माघारी परतला. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियानं १ बाद ३९ धावा केल्या होत्या. जेम्स अँडरसननं सर्वाधिक ४ वेळा अजिंक्य रहाणेला शून्यावर माघारी पाठवले. यानंतर वीरेंद्र सेहवाग ( ३) व मुरली विजय ( ३) यांचा क्रमांक येतो. 

अँडरसननं मोडला कर्टनी वॉल्श यांचा विक्रम
तीशीपार जाऊन सर्वाधिक विकेट्स घेण्याचा जलदगती गोलंदाजाचा विक्रम अँडरसनच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यानं तीशीनंतर ३४३ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी विंडीजचे दिग्गज कर्टनी वॉल्श ( ३४१) यांच्या नावावर हा विक्रम होता. ग्लेन मॅकग्रा ( २८७) आणि रिचर्ड हेडली ( २७६) हे तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर आहेत. या विक्रमात श्रीलंकेचा रंगना हेराथ ३९८ विकेट्सह आघाडीवर आहे. त्यानंतर मुथय्या मुरलीधरन ( ३८८) आणि शेन वॉर्न ( ३८६) यांचा क्रमांक येतो. अनिल कुंबळे ३४३ विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहेत.  
 

Web Title: James Anderson surpasses Courtney Walsh by taking most number of wickets as a pacer since the age of 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.