दरबान : क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे, असे म्हटले जाते. काही वेळा मैदानात खेळाडूंकडून असभ्य वर्तन घडते. काही खेळाडू प्रतिस्पर्धी खेळाडूंवर भाष्य करतात. पण एकदा का दिवसाचा खेळ संपला की खेळाडू सारे काही विसरून जातात. पण ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार आणि धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॅार्नर या गोष्टीला अपवाद ठरला आहे. कारण चैाथ्या दिवसाचा खेळ संपल्यावर दोन्ही संघ पेव्हेलियनमध्ये परतत असताना वॅार्नर दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजावर चांगलाच भडकलेला पाहायला मिळाला.ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला कसोटी सामना सुरु आहे. सामन्याच्या चैाथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेपुढे 417 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना फारशी चांगली कामिगरी करता आली नाही. पण सलामीवीर एडिन मार्कराम क्विंटन डी कॅाक यांनी दमदार फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला चैाथ्या दिवशी विजयाची चव चाखू दिली नाही.दक्षिण आफ्रिकेचा नावाजलेला फलंदाज ए बी डीव्हिलियर्सला भोपळाही फोडू न देता ऑस्ट्रेलियाने तंबूचा रस्ता दाखवला. त्यावेळी वॅार्नर मार्करामजवळ गेला आणि त्याला काही अपशब्द वापरले. त्यानंतर पंचांनी वॅार्नरला ताकिद दिली होती. मार्कराम 143 धावांची खेळी साकारून बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला आपण चैाथ्या दिवशी सामना जिंकू, असे वाटायला लागले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या या मार्गात अडसर बनला तो क्विंटन डी कॅाक.सामना चैाथ्या दिवशी जिंकता आला नाही, हा राग कुठेतरी वॅार्नरच्या मनात खदखदत होता. आपल्या या विजयाच्या मार्गात अडसर बनलेल्या क्विंटन डी कॅाकला तो मैदानात काही बोलला नाही. पेव्हेलियनमध्ये दोन्ही संघ जात असताना वॅार्नरला राग आवरता आला नाही. त्याने क्विंटन डी कॅाकला अपशब्द वापरायला सुरुवात केली. वॅार्नर यावेळी क्विंटन डी कॅाकला फक्त अपशब्द वापरून थांबला नाही, तर त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही त्याने केला. यावेळी त्याला उस्मान ख्वाजा, नॅथन लियॅान आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी रोखले.पेव्हेलियनमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या सर्व गोष्टी कैद झाल्या असून त्याद्वारे या प्रकरणावर दोन्ही संघ आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. जी काही घडना घडली त्याबद्दल आम्ही सविस्तर माहिती घेत आहोत. जर वॅार्नर दोषी असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- डेव्हिड वॅार्नर को घुस्सा क्यू आता हैं
डेव्हिड वॅार्नर को घुस्सा क्यू आता हैं
वॅार्नर यावेळी फक्त त्या खेळाडूवर अपशब्द वापरून थांबला नाही, तर त्याने त्याच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्नही केला. यावेळी वॅार्नरला उस्मान ख्वाजा, नॅथन लियॅान आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी रोखले.
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 12:32 IST
डेव्हिड वॅार्नर को घुस्सा क्यू आता हैं
ठळक मुद्देखेळ संपल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या या फलंदाजावर बरसला वॅार्नर; क्रिकेट ऑस्ट्रेलिया घेणार दखल