Join us

डेव्हिड वॉर्नर लवकरच क्रिकेटच्या मैदानात दिसणार

वॉर्नरवर एका वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. पण या प्रकरणाला दोन महिने होत नाही तर वॉर्नर पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2018 16:59 IST

Open in App
ठळक मुद्देवॉर्नर वर्षभर आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नसला तरी तो क्लब क्रिकेच मात्र नक्कीच खेळू शकतो.

सिडनी : चेंडूशी छेडछाडकेल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दोषी आढळला होता. त्यामुळे वॉर्नरवर एका वर्षाची बंदीही घालण्यात आली होती. पण या प्रकरणाला दोन महिने होत नाही तर वॉर्नर पुन्हा एकदा मैदानात दिसणार आहे.

चेंडूशी छेडछाड केल्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वॉर्नरवर एका वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे वॉर्नर एक वर्ष तरी मैदानात दिसणार नाही, असे बऱ्याच जणांन वाटले होते. पण ही शिक्षा सुनावल्यावर दोन महिन्यांतच वॉर्नर आपल्याला क्रिकेट खेळताना दिसणार आहे. वॉर्नर वर्षभर आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकणार नसला तरी तो क्लब क्रिकेच मात्र नक्कीच खेळू शकतो. त्यानुसार वॉर्नर सिडनीतील रेंडविक पीटरशॅम या क्लबमधून खेळणार आहे. 

रेंडविक पीटरशॅम माईक व्हाइटनी यांनी याबाबत सांगितले की, " वॉर्नर आमच्या संघातून खेळत आहे, आमच्यासाठी ही आनंददायी बाब आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर वॉर्नर हा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याची उपस्थिती आमच्या संघाचे मनोबल वाढवणी आहे. वॉर्नर आमच्या क्लबसाठी किमान तीन सामने तरी खेळणार आहे. "

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरचेंडूशी छेडछाडआयसीसी