ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज डेविड वॉर्नर याने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण अजूनही तो फ्रँचायझी क्रिकेटमध्ये आपली धमक दाखवताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन बिग बॅश लीग स्पर्धेत वॉर्नरनं मोठा धमाका केल्याचे पाहायला मिळाले. ६१ चेंडूतील धमाकेदार शतकासह त्याने किंग कोहलीला मागे टाकले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बिग बॅश लीगमध्ये डेविड वॉर्नरचा शतकी धमाका
बिग बॅश लीग (BBL) स्पर्धेत रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी सिडनी सिक्सर्स आणि सिडनी थंडर्स यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळाले. सिडनी सिक्सर्सच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून सिडनी थंडर्सला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. याच सामन्यात कर्णधार डेविड वॉर्नर सलामीवीर म्हणून मैदानात उतरला आणि शतकी खेळीसह त्याने कमाल करून दाखवली.
आता हिटमॅन रोहित शर्माच्या रडारवर पाकिस्तानी स्फोटक बॅटर शाहिद आफ्रिदीचा वर्ल्ड रेकॉर्ड
किंग कोहलीला टाकले मागे
एका बाजूने विकेट्स पडत असताना दुसऱ्या बाजूने वॉर्नर मैदानात तग धरून फक्त थांबला नाही तर त्याने चौकार षटकारांची बरसात करत तोऱ्यात अर्धशतक साजरे केले. या अर्धशतकाचे शतकात रुपांतरित करत त्याने किंग कोहलीला मागे टाकले. टी-२० क्रिकेटमध्ये वॉर्नरच्या भात्यातून निघालेले हे दहावे शतक ठरले. कोहलीनं आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय टी-२० आणि फ्रँचायझी क्रिकेटमधील टी-२० सामन्यात मिळून ९ शतके झळकावली आहेत.
ख्रिस गेल अव्वल!
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आपल्या आपल्या टी-२० कारकिर्दीत तब्बल २२ शतके झळकावली आहेत. पाकिस्तानचा बाबर आझम ११ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर असून त्यापाठोपाठ डेविड वॉर्नर आणि विराट कोहली अनुक्रमेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
सलामीला येऊन अखेरपर्यंत नाबाद राहिला वॉर्नर
नव्या वर्षातील पहिले शतक झळकवताना डेविड वॉर्नरनं आपली पॉवर तर दाखवली. विशेष म्हणजे तो या सामन्यात शेवटपर्यंत नाबाद राहिली. बिग बॅश लीग स्पर्धेतील त्याच्या भात्यातून आलेले हे तिसरे शतक ठरले. आतापर्यंत या स्पर्धेत बेन मॅकडरमॉट, स्टीव्हन स्मिथ आणि आता डेविड वॉर्नर या तिघांनीच तीन शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
Web Summary : David Warner smashed a century in the Big Bash League, surpassing Virat Kohli's T20 century record. Warner now has ten T20 centuries, while Kohli has nine. Chris Gayle leads with 22 centuries. Warner remained unbeaten, marking his third BBL century, joining McDermott and Smith.
Web Summary : डेविड वार्नर ने बिग बैश लीग में शतक जड़ा, विराट कोहली का टी20 शतक रिकॉर्ड तोड़ दिया। वार्नर के अब दस टी20 शतक हैं, जबकि कोहली के नौ। क्रिस गेल 22 शतकों के साथ शीर्ष पर हैं। वार्नर नाबाद रहे, जो मैकडरमोट और स्मिथ के साथ उनका तीसरा बीबीएल शतक है।