CSK Vs DC: चेन्नईचा दिल्लीविरुद्ध दणदणीत विजय, मात्र सामन्यात कर्णधार धोनीकडून झाली मोठी चूक, नेमकं काय घडलं, पाहा...

MS Dhoni: आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून एक मोठी चूक झाली. या चुकीची फॅन्स धोनीकडून अपेक्षा करत नव्हते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 02:13 PM2023-05-11T14:13:12+5:302023-05-11T14:13:37+5:30

whatsapp join usJoin us
CSK Vs DC: Chennai's resounding win against Delhi, but skipper Dhoni made a big mistake in the match, what exactly happened, see... | CSK Vs DC: चेन्नईचा दिल्लीविरुद्ध दणदणीत विजय, मात्र सामन्यात कर्णधार धोनीकडून झाली मोठी चूक, नेमकं काय घडलं, पाहा...

CSK Vs DC: चेन्नईचा दिल्लीविरुद्ध दणदणीत विजय, मात्र सामन्यात कर्णधार धोनीकडून झाली मोठी चूक, नेमकं काय घडलं, पाहा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएलमध्ये काल रात्री झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सवर दणदणीत विजय मिळवला. दरम्यान, सामना सुरू होण्यापूर्वी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून एक मोठी चूक झाली. या चुकीची फॅन्स धोनीकडून अपेक्षा करत नव्हते.

त्याचं घडलं असं की, नाणेफेक जिंकल्यानंतर जेव्हा धोनीने आपल्या प्लेईंग इलेव्हनबाबत सांगितलं तेव्हा त्याने शिवम दुबे याच्या ऐवजी अंबाती रायडूचं नाव घेतलं. मात्र जेव्हा टीव्हीवर प्लेईंग इलेव्हनची यादी दिसली तेव्हा त्यामध्ये शिवम दुबेचं नाव होतं. दरम्यान, प्लेईंग इलेव्हनबाबत धोनीकडून झालेल्या चुकीवरून ट्रोल्स त्याच्याबाबत मिम्स शेअर करत आहेत. धोनी हा त्याच्या संघातील खेळाडूंची नावं सहजपणे घेतो. मात्र जेव्हा बुधवारी चेन्नई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यावेळी धोनीला खेळाडूंचा विसर पडल्याने त्याच्या फॅन्सनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

दरम्यान, चेन्नई सुपरकिंग्सने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात केली. या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चेन्नईने २० षटकांत १६७ धावा फटकावल्या. त्यानंतर या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १४० धावांवर गारद झाला. त्यामुळे चेन्नईने हा सामना २७ धावांनी जिंकला.  

Web Title: CSK Vs DC: Chennai's resounding win against Delhi, but skipper Dhoni made a big mistake in the match, what exactly happened, see...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.